yuva MAharashtra सांगलीतील पोलीस भरती प्रक्रिया पूर्ण; पात्र उमेदवारांची या ठिकाणी प्रसिद्ध !

सांगलीतील पोलीस भरती प्रक्रिया पूर्ण; पात्र उमेदवारांची या ठिकाणी प्रसिद्ध !


सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २९ जून २०२४
सांगली जिल्हा पोलीस दलात पुरुष व महिला पोलीस शिपाई पदांकरीता २७ रिक्त पदे, चालक पोलीस शिपाई पदांकरीता १३ रिक्त पदे अशा एकूण ४० रिक्त पदांकरीता भरती प्रक्रिया पूर्ण झाल्या. या भरतीसाठी मोठ्या प्रमाणावर तरुण-तरुणींनी अर्ज केले होते. 

त्यानुसार रिक्त पदांच्या भरती प्रक्रियेतील लेखी परिक्षा व कौशल्य चाचणीकरीता पात्र उमेदवारांची यादी संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. 


त्यातील तसेच शारीरिक चाचणी व मैदानी चाचणी पात्र झालेल्या पोलीस शिपाई पदासाठी १:१० प्रमाणे लेखी परीक्षेसाठी व पोलीस शिपाई चालक पदासाठी कौशल्य चाचणीकरीता पात्र असलेल्या १:१५ प्रमाणे उमेदवारांचे गुणपत्रक यादी सांगली जिल्हा पोलीस दलाचे अधिकृत प्रसिध्दी माध्यम sp.sangli@mahapolice.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच उमेदवारांना प्रत्यक्ष पाहण्यासाठी सदरची माहिती पोलीस अधीक्षक, सांगली यांचे कार्यालयाबाहेर व पोलीस कवायत मैदान, पोलीस मुख्यालय, सांगली या ठिकाणी लावण्यात आलेली आहे.

संबंधित प्रक्रिया पूर्ण केलेल्या उमेदवारांनी जिल्हा पोलीस मुख्यालय अथवा सांगली जिल्हा पोलीस दलाचे अधिकृत संकेतस्थळावर पाहावयास मिळतील, अशी माहिती जिल्हा पोलीस मुख्यालयाच्या प्रसिद्धी पत्रकातून देण्यात आली आहे.