yuva MAharashtra स्क्रॅप केलेल्या वाहनाचा लकी नंबर आपणास पुन्हा मिळणार !

स्क्रॅप केलेल्या वाहनाचा लकी नंबर आपणास पुन्हा मिळणार !


सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २६ जून २०२४
आपल्या प्रत्येकालाच आपल्या चार चाकी असो वा दुचाकी यासाठी आर. टी. ओ. रजिस्टर नंबरवर विशेष प्रेम असते. कधीकधी आपण ज्यादा पैसे मोजूनही हा नंबर घेतलेला अअसतो. तर कुणासाठी त्याच्या गाडीचा नंबर लकी असतो. मध्यंतरी शासनाने पंधरा वर्षांपूर्वीच्या गाड्या स्क्रॅप करण्याचा आदेश काढलेला होता. नंतर शासनाच्या नियमाप्रमाणे पैसे भरून ही गाडी नूतनीकरण करण्याचा नियम केला आहे. 

परंतु काही कारणामुळे आपण ही गाडी शासनाच्या नियमाप्रमाणे नूतनीकरण करू शकलो नाही. आणि ती स्क्रॅप करावे लागली, तर आपला आवडता नंबरही स्क्रॅप होणार की काय ? असा प्रश्न निर्माण झाला होता. परंतु वाहनधारकांच्या 'नंबर प्रेमाचा' विचार करून, स्क्रॅप केलेल्या गाडीचा नंबर आपल्याला हवा असेल, तर शासनाच्या नियमाप्रमाणे ठराविक रक्कम भरून तोच नंबर आपण नव्या गाडीसाठी नोंदणी करू शकतो. यामुळे 'नंबर प्रेमी' वाहनधारकांसाठी ही आनंदाची बातमी आहे.