yuva MAharashtra निवडणुकीच्या भीतीने केलेली धडपड म्हणजे महायुतीचा अर्थसंकल्प - पृथ्वीराज पाटील

निवडणुकीच्या भीतीने केलेली धडपड म्हणजे महायुतीचा अर्थसंकल्प - पृथ्वीराज पाटील


सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २९ जून २०२४
महायुतीचे हे बजेट म्हणजे लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मिळालेले घवघवीत यश आणि महायूतीला महाराष्ट्रातील जनतेने दिलेली चपराग यामुळे सरकारच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. विधानसभेला पुन्हा एकदा तोंडावर पडायला लागेल या भीतीने केलेली धडपड म्हणजे आजचा अर्थसंकल्प आहे. अशी जळजळ प्रतिक्रिया सांगली शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी व्यक्त केली आहे.


केलेल्या घोषणा पैकी प्रत्यक्ष लाभार्थी पर्यंत कशी पोहचणार त्यासाठीची आर्थिक तरतूद कशी करणार फक्त आणि फक्त आगामी विधानसभा निवडणुकीत दुरावलेल्या मतदारांना आमिष दाखवण्याचा प्रयत्न या अर्थसंकल्पातून दिसून येत आहे.