yuva MAharashtra एक्झिट पोलने वाढवलं भाजपचं टेन्शन? वर्षा गायकवाड की उज्ज्वल निकम, मतदारराजाने कोणाच्या बाजूने निर्णय सुनावला ?

एक्झिट पोलने वाढवलं भाजपचं टेन्शन? वर्षा गायकवाड की उज्ज्वल निकम, मतदारराजाने कोणाच्या बाजूने निर्णय सुनावला ?



| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. ३ जून २०२४
एक्झिट पोलने वाढवलं भाजपचं टेन्शन? वर्षा गायकवाड की उज्ज्वल निकम, मतदारराजाने कोणाच्या बाजूने निर्णय सुनावला ? मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघ. या जागेवर गेली दोन टर्म पूनम महाजन खासदार आहेत. काँग्रेस, कम्युनिस्ट, शिवसेना, आरपीआय अशा एक ना अनेक पक्षांना इथल्या मतदारांनी साथ दिलीये. २०१४ साली विद्यमान खासदार असलेल्या प्रिया दत्त यांचा पूनम महाजन यांनी पराभव केला आणि त्या लोकसभेत पोहोचल्या.

मात्र यंदा त्यांचं तिकीट कापून पक्षाने येथून ज्येष्ठ विधीज्ञ उज्ज्वल निकम यांना तिकीट दिलं आहे. तर त्यांच्या विरुद्ध काँग्रेसने येथून वर्षा गायकवाड यांचा तिकीट दिलं आहे.


वर्षा गायकवाड बाजी मारणार?

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात म्हणजेच २० मे रोजी मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघासाठी मतदान पार पडलं. सायंकाळी ६ वाजेपर्यंत ५१.९८ टक्के मतदान झालं. ज्याचा निकाल ४ जून रोजी जाहीर होणार आहे. याआधी एक्झिट पोलमधून भाजपला धक्का बसला आहे. उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात वर्षा गायकवाड आघाडीवर आहेत, असा एक्झिट पोलचा अंदाज आहे. तर उज्ज्वल निकम हे पिझाडीवर आहेत, असा अंदाज एक्झिट पोलमधून समोर आला आहे.