Sangli Samachar

The Janshakti News

जगद्गुरु तुकोबाराय साहित्य परिषदेच्या सांगली जिल्हा अध्यक्षपदी तानाजीराजे जाधव यांची फेरनिवड !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २४ जून २०२४
मराठा सेवा संघ प्रणित जगद्गुरु तुकोबाराय साहित्य परिषदेच्या सांगली जिल्हा अध्यक्षपदी तानाजी राजे जाधव यांची तर जिल्हा कार्याध्यक्षपदी सौ मनीषा पाटील हरोलीकर यांची फेरनिवड करण्यात आली. परिषदेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष डॉ. सतीश तराळ यांनी नूतन कार्यकारणी जाहीर केली. यावेळी त्यांच्या हस्ते कार्यकारणीतील सर्वांना नियुक्त पत्र प्रदान करण्यात आले. यावेळी मराठा सेवा संघाचे जिल्हा सचिव अमृत तात्या सूर्यवंशी, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष युवराज शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी विविध पुरस्कार मिळालेल्या साहित्यिकांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या सांगली जिल्हा शाखेच्या सदस्य पदी निवड झाल्याबद्दल कुलदीप देवकुळे यांचाही सत्कार करण्यात आला.


नूतन सांगली जिल्हा कार्यकारिणी

तानाजी राजे जाधव - अध्यक्ष, सौ मनीषा ताई पाटील - जिल्हा कार्याध्यक्ष, सौ मनीषा रायजादे व आनंदराव जाधव - जिल्हा उपाध्यक्ष, गजानन पाटील - कोषाध्यक्ष, सुप्रिया मगदूम - सचिव, कार्यकारिणीतील इतर सदस्य असे - भगवान पाटील, संभाजी माने, डॉ. स्वाती पाटील, विनायक कदम, दीपक पवार, शांता वडेर, 

मराठा सेवा संघ सांस्कृतिक भवन येथे संपन्न झालेल्या पदग्रहण समारंभानंतर आनंदराव जाधव यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलन घेण्यात आले. यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील ६० कवींनी सहभाग घेतला. कवी संमेलनापूर्वी डॉ. डॉ सतीश तराळ यांनी मराठा सेवा संघ आणि जगद्गुरु तुकोबाराय साहित्य परिषदेच्या वाटचाली बाबत माहिती दिली.

सुरुवातीस मनीषा पाटील हरोलीकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले, तर प्रास्ताविक तानाजी राजे जाधव यांनी केले. शेवटी मनीषा रायजादे व गजानन पाटील यांनी आभार प्रदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुप्रिया मगदूम यांनी केले.