| सांगली समाचार वृत्त |
नवी दिल्ली - दि. १२ जून २०२४
केंद्र सरकारने जनरल उपेंद्र द्विवेदी यांची पुढील लष्करप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 30 जून रोजी द्विवेदी पदाभार स्वीकारणार आहेत. याच दिवशी विद्यमान लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे निवृत्त होणार आहेत.
जनरल मनोज पांडे यांना 30 एप्रिल 2022 रोजी लष्करप्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आले होते. 31 मे रोजी ते निवृत्त होणार होते, परंतु 26 मे रोजी मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीतर्फे एक महिन्याची मुदतवाढ मिळाल्याने जनरल पांडे 30 जून पर्यंत कार्यरत असतील. त्यानंतर सध्याचे लष्कर उप्रमुख उपेंद्र द्विवेदी लष्करप्रमुख पदाचा पदाभार स्वीकारतील.