Sangli Samachar

The Janshakti News

जागतिक बँकेच्या प्रतिनिधींची महापालिका क्षेत्रातील पूरबाधित ठिकाणी भेट !


सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २६ जून २०२४
सांगली महापालिका क्षेत्रात महापुरामुळे आणि अतिवृष्टीमुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासापासून लवकरच मुक्तता मिळणार आहे. याचे कारण म्हणजे जागतिक बँकेच्या प्रतिनिधींनी शहरातील अशा पूरग्रस्त व अतिवृष्टीमुळे पाणी साठणाऱ्या ठिकाणी भेट देऊन, उपाययोजना करण्याची चर्चा केली आहे.

सांगली महापालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली सांगलीतील महापौर नियंत्रण करण्यासाठी महापालिकेने जागतिक बँकेच्या अर्थसहाय्यासाठी माकडे 406 कोटींचा प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावाच्या अनुषंगाने आज जागतिक बँकेच्या पथकाने सांगलीतील महापूर बाधित अनेक ठिकाणांची पाहणी केली. यामध्ये आयर्विन पूल, शामराव नगर, के. टी. बंधारा, मारुती चौक, अमरधाम, कुंभार मळा याशिवाय कृष्णा नदी काठावरील परिसराची पाहणी केली.


यावेळी आपत्ती व्यवस्थापन केंद्रास भेट देऊन या समितीतील सदस्यांनी आपत्ती व्यवस्थापन केंद्र अद्यावत केले असल्याबद्दल अभिनंदन केले आहे. तसेच महापालिका क्षेत्रातील पूर बाधित क्षेत्र आणि पावसाळी दिवसात साचून राहणाऱ्या पाण्याचा निचरा करण्यासाठी उपाय योजना करण्यासाठी चर्चा करण्यात आली आहे.

यावेळी आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता यांच्या उपस्थितीत स्थायी समिती सभागृहात जागतिक बँक प्रतिनिधी अनुप कारस्थान, पती जोखीम व्यवस्थापन विशेषज्ञ सविनय ग्रोवर, वरिष्ठ वित्तीय व्यवस्थापन विशेषज्ञ वरून सिंग, वरिष्ठ सामाजिक विकास विशेषणे श्रीमती नेहा व्यास, अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, चंद्रकांत खोसे, शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण, मुख्य लेखापरीक्षक शिरीष धनवे, डॉक्टर रवींद्र ताटे, सहायक आयुक्त आपत्ती व्यवस्थापन नकुल जकाते, जनसंपर्क अधिकारी धनंजय हर्षद, विशेष कार्यकारी अधिकारी सुनील पाटील अभियंता महेश मदने, तसेच वरिष्ठ पर्यावरण तज्ञ यांचा समावेश होता. यावेळी गौरव अँड कन्सल्टंट यांनी स्ट्रम वॉटर मॅनेजमेंट बाबत प्रेझेंटटेशन दिले.