Sangli Samachar

The Janshakti News

मानसिक स्वास्थ्यासाठी निशुल्क योगाचे धडे देणारे शाम वैद्य सर साक्षात रामदेव बाबाच - राज्य प्रवक्ते संतोष पाटील !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २३ जून २०२४
गेल्या अनेक वर्षांपासून महावीर उद्यान बापट मळा सांगली या ठिकाणी मनुष्य जीवनाचे मानसिक स्वास्थ व्यवस्थित राहण्यासाठी व त्यांना कुठल्याही शारीरिक व्याधी लागू नये म्हणून एक रुपयाची फी न घेता नि:शुल्क सेवाभावी वृत्तीने योगाचे धडे देणारे आदरणीय श्याम वैद्य सर म्हणजे सांगलीचे रामदेव बाबाच होय असे उद्गार जागतिक योग दिनाच्या दिवशी व श्याम वैद्य सरांचा वाढदिवस साजरा करताना राज्य प्रवक्ते माननीय संतोष पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

यावेळी संतोष पाटील म्हणाले की, मी गेले अनेक वर्षापासून या बापट मळ्यामध्ये फिरायला येत असतो. या ठिकाणी मी हास्य क्लबमध्ये जाऊन वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम व हास्य करण्याचा आनंद घेत असतो. त्यानंतर आम्ही श्याम वैद्य सर दररोज न चुकता नि:शुल्क सेवाभावी मनाने एक रुपयाची फी न घेता अनेक वर्षापासून स्वतः योगा करून इतरांना योगा करायला शिकवतात यामुळे ज्यांना ज्यांना शारीरिक व्याधी असतात, काहीजणांना दुर्धर आजार असतात यामध्ये हायपर टेन्शन, ब्लडप्रेशर, मणक्याचे आजार, पायांचे आजार, डोकेदुखीचे आजार, पोटाचे आजार, हृदयाचे आजार, मधुमेह, घशाचे कानाचे आजार अशा अनेक प्रकारचे आजार असणारे व्यक्तीही योगाचे धडे घेऊन व दररोज नित्यनेमाने योगा करून शारीरिक तंदुरुस्ती व्यवस्थित ठेवून बरे झालेली आणि उदाहरण आहेत.


कितीही वयाची व्यक्ती यामध्ये वयस्कर महिला, पुरुष, मुले, युवक, येवती या आनंद उत्साहाने भाग घेऊन योगा करत असतात. योगा केल्यानंतर दिवसभर फ्रेश राहून कुठल्याही वयातील व्यक्ती दिवसभर शरीर फ्रेश राहते व आपली दैनंदिन कामे सहज करतात. 

आज योग दिनाचा औचित साधून व आदरणीय श्याम सरांचा वाढदिवसाच्या निमित्ताने सरांचा सत्कार करण्यात आला. त्यांच्या वाढदिवशीच हा जागतिक योगा दिन येत असल्यामुळे श्याम सर म्हणजेच साक्षात सांगलीचे रामदेव बाबाच आहेत असे गौरवोद्गार राज्य प्रवक्ते संतोष पाटील यांनी जागतिक योगा दिवस व वैद्य सरांच्या वाढदिवसानिमित्त आपल्या भावना व्यक्त केल्या.

या वेळेला सर्वांनी श्याम वैद्य सरांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन केक व नाश्त्याचा आस्वाद घेतला यासाठी बहुसंख्य नागरिक उपस्थित राहून योगा करून श्याम वैद्य सरांना भविष्यकाळासाठी सुख समृद्धी व दीर्घायुष्य लाभो अशा शुभेच्छा दिल्या.