yuva MAharashtra नवल बजाज बनले महाराष्ट्र एटीएसचे नवे प्रमुख !

नवल बजाज बनले महाराष्ट्र एटीएसचे नवे प्रमुख !


| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. २० जून २०२४
आयपीएस अधिकारी नवल बजाज यांची महराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाचे अर्थात एटीएस प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या काही काळापासून बजाज हे नियुक्तीच्या प्रतिक्षेत होते. अखेर आज त्यांची एटीएसप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली. 


नवल बजाज हे सन १९९५ बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. मुंबईत त्यांनी अनेक महत्वाची पदं सांभाळलेली आहेत. सध्या ते अतिरिक्त पोलीस महासंचालक म्हणून काम पाहत आहेत. येत्या काही काळात ते निवृत्त होणार आहेत. पण लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्यानं त्यांची शेवटची नियुक्ती रखडली होती. पण अखेर त्यांची एटीएसच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे.