Sangli Samachar

The Janshakti News

ऑनलाइन फसवणुकीचा नवा फंडा, असा करा प्रतिकार !


सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. २४ जून २०२४
सध्या ऑनलाईन फसवणुकीचे नवनवे फंडे शोधले जात आहेत. कधी एसएमएस द्वारे, कधी फोन करून तर कधी आपण विचारही करू शकत नाही इतक्या बेमालूमपणे फसवणूक होत असते. याबाबत आपण वृत्तपत्रातून वाचतो, टीव्हीवर बातम्यात पाहतो. सोशल मीडियावर तर अशा ऑनलाइन फ्रॉड बाबत अनेक मेसेज येऊन धडकत असतात. पण फ्रॉड करणारे इतके चालक असतात की आपण त्यांच्या जाळ्यात कधी आणि कसे फसतो हे आपल्यालाही कळत नाही. परंतु अनेक जागरूक नागरिक याबाबत सावधगिरी मात्र बाळगत असतात.


व्हायरल व्हिडिओ


अशा फ्रॉड बाबत सावधता संदेश देणारा सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये आपली कशी फसवणूक होऊ शकते हे उदाहरणासह दाखवले आहे, आणि आपण याबाबत काय आणि कशी काळजी घ्यावी याचीही माहिती या व्हिडिओ मधून देण्यात आली आहे. यानुसार आपण काळजी घेतली तर आपली फसवणूक टळू शकते.