| सांगली समाचार वृत्त |
नवी दिल्ली - दि. ३० जून २०२४
आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात 'मित्र' नावाची एक व्यक्ती असते. दोघांमध्ये ना जातीची, ना धर्माची ना श्रीमंत गरिबीची भिंत असते. मैत्री म्हणजे मैत्रीच असते. कधी परिस्थितीमुळे जरी दोघे वेगळे झाले, तरी दोघांमधील मैत्री कमी होत नाही. कोणत्या ना कोणत्या माध्यमातून हे दोघे एकमेकांशी 'कनेक्टेड' असतात. सध्या इंटरनेटच्या जमान्यामध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून ही मैत्री अखंड दरवळत असते.
परंतु कधी कधी दोन मित्र अगदी शाळेच्या बाकावरून ते थेट, कधी व्यवसायाच्या माध्यमातून तर कधी नोकरीच्या माध्यमातून एकत्र असतात. अशाच दोन मित्रांची चर्चा सर्वत्र होते आहे. हे दोन मित्र म्हणजे, भारतीय लष्करी इतिहासातील लिजेंड ठरलेले आहेत. एक आहेत लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी तर दुसरे आहेत, नौदल प्रमुख ऍडमिरल दिनेश त्रिपाठी.
विशेष म्हणजे नौदल प्रमुख ऍडमिरल दिनेश त्रिपाठी आणि लष्कर प्रमुख लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी मध्यप्रदेशातील रेवा येथील सैनिक स्कूलमध्ये शिक्षण घेतले आहे 1970 च्या दशकात सुरुवातीस ते इयत्ता पाचवी ते येथील शिक्षण पूर्ण होईपर्यंत एकत्र होते. दोघांची मैत्री सैनिक स्कूलमध्ये चिरपरिचित. भारतीय लष्करात सहभागी झाल्यानंतर ही त्यांची मैत्री ही अखंडच राहिली आहे.
सध्या दोघेही वेगवेगळ्या लष्कराच्या कार्यक्षेत्रात असले तरीही त्यांची मैत्री खास आहे. लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी हे आज रविवार दि. 29 जून रोजी लष्कर प्रमुख म्हणून पदभार स्वीकारतील तर एप्रिल दिनेश त्रिपाठी 30 एप्रिल पासून नौदल प्रमुख होणार आहेत.
लेफ्टनंट जनरल द्विवेदी अशा वेळी लष्करप्रमुख म्हणून पदभार स्वीकारत आहेत जेव्हा लष्करात संरचनात्मक सुधारणांसह आधुनिकीकरण होत आहे. लेफ्टनंट जनरल द्विवेदी यांचा नॉर्दन आर्मी कमांडर म्हणून दीर्घकाळ कार्यकाळ राहिला आहे. त्यांना चीन आणि पाकिस्तानच्या सीमेवरील कारवायांचा मोठा अनुभव आहे.