Sangli Samachar

The Janshakti News

'सगेसोयरे'बाबत निर्णय घेतल्यास परिणामांना सामोरे जाण्याचा बहुजन परिषदेने दिला इशारा

| सांगली समाचार वृत्त |
विटा - दि. २१ जून २०२४
सध्या राज्यात आरक्षणाबाबत मराठा समाज मोठ्या प्रमाणावर आंदोलन करीत आहे. मनोज जरांगे हे मराठा नेते ओबीसी कोठ्यातून सरसकट सगेसोयरे आरक्षणाच्या मागणीवर ठाम आहेत. परंतु सरकारने याबाबत निर्णय घेतल्यास ओबीसी समाज त्याला कडाडून विरोध करेल व होणाऱ्या परिणामांना शासन जबाबदार असेल असा इशारा ओबीसी व्हीजेटीआय बहुजन परिषदेचे सचिव संग्राम माने यांनी दिला आहे. याबाबतचे निवेदन निवेदन विटा तहसीलदार उदयसिंह गायकवाड यांच्याकडे दिले.

मनोज जरांगे यांनी कोणीबी म्हणून ज्यांना नोंद पत्र मिळेल, त्यांच्या सग्यासोयऱ्यांनाही आरक्षण मिळावे, अशी मागणी लावून धरली आहे. शासन त्याला प्रतिसादही देत आहे. याला कदाचित हा निर्णय झाला तर ओबीसी समाजावर मोठा अन्याय होणार आहे म्हणूनच वेळप्रसंगी ओबीसी समाज रस्त्यावरील लढाईस प्रवृत्त होईल आणि यास शासन जबाबदार असेल असे संग्राम माने यांनी म्हटले आहे.


यावेळी प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी सुरू केलेल्या बेमुदत उपोषण आंदोलनाला पाठिंबा देण्यात आला.

विटा तहसील कार्यालयात सर्वपक्षीय नेत्यांनी नुकताच मोर्चा काढला. यावेळी किरण तारळेकर, वैभव चोथे, भीमराव काशीद, माधव रोकडे, उत्तमराव चोथे, सुनील मेटकरी, किशोर डोंबे आदी समाज बांधव उपस्थित होते.

शासनाने 19 डिसेंबर 2023 रोजी नागपूर अधिवेशनात खाजगी महाविद्यालय मध्ये ओबीसी आणि एससी यांचे शिष्यवृत्ती परिपूर्ती विधेयक नंबर 53 हे पास केल्याने मागास प्रवर्ग जमातीतील विद्यार्थ्यां वर अन्याय होणार आहे ते शिक्षण प्रवाहातून दूर जाण्याची शक्यता आहे हा निर्णयही शासनाने तात्काळ मागे घ्यावा अशी मागणी ही यावेळी करण्यात आली