Sangli Samachar

The Janshakti News

खा. राहुल गांधींचा ५४ वा वाढदिवस रक्तदानाने साजरा, सांगली काँग्रेसचा रचनात्मक उपक्रम !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १९ जून २०२४
काँग्रेस नेते खासदार मा. राहुलजी गांधी यांचा ५४ वा वाढदिवस आज काँग्रेस भवनमध्ये रक्तदान उपक्रमाने साजरा झाला. सांगली शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष मा. पृथ्वीराजबाबा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आज खासदार राहूल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त ५४ तरुण काँग्रेस कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. श्री सिध्दीविनायक गणपती कॅन्सर हाॅस्पिटल कडून डॉ. मोहन मेंढापूरकर व जितेंद्र पत्की यांच्या निगराणीखाली रक्तसंकलन करण्यात आले.

यावेळी पृथ्वीराजबाबा पाटील म्हणाले, 'काँग्रेस पक्षाच्या असंख्य नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी स्वातंत्र्यासाठी रक्त सांडले म्हणून भारत स्वतंत्र झाला. स्व. इंदिरा गांधी, स्व. राजीव गांधी यांनी देशासाठी रक्त सांडून बलिदान दिले. अशा त्यागमूर्ती गांधी घराण्याचा देशभक्त वारसदार खा. मा. राहूल गांधी यांनी भारत जोडो यात्रा काढून नफरत छोडो.. भारत जोडो हा नारा देऊन देशाला मजबूत करण्यासाठी बरंच रक्त आटवलं. अशा मानवतावादी काँग्रेस नेत्याच्या ५४ व्या वाढदिवसानिमित्त काँग्रेस कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे ५४ बाटल्यांचे रक्तदान केले. त्याबद्दल मी काँग्रेस कार्यकर्त्यांचे अभिनंदन करतो. 


कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते पुढे म्हणाले, 'भारताचे स्वातंत्र्य व लोकशाही आणि संविधान रक्षणासाठी खा. मा. राहूल गांधी यांच्या भारत जोडोचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आदर्श नागरीक व संवेदनशील माणूस बनण्याचा प्रयत्न सर्वांनी करावा.तुम्ही दिलेले रक्त एखाद्याचा जीव वाचवण्यासाठी उपयोगी पडणार आहे. त्यामुळे तुम्ही खरा भारत जोडणारे व देशातील सर्व जनतेवर मोहबत करणारे काँग्रेस कार्यकर्ते आहात.'
पृथ्वीराजबाबा पाटील व पदाधिकाऱ्यांच्या हस्ते रक्तदान प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. यावेळी बिपीन कदम, सनी धोतरे, अजय देशमुख, माजी नगरसेवक अल्ताफ पेंढारी, रविंद्र वळवडे, तौफिक शिकलगार, अल्बर्ट सावर्डेकर, अमित पारेकर, प्रा. एन.डी.बिरनाळे, आशिष चौधरी, आशिष कोरी, अजित ढोले, बाबगोंडा पाटील, देशभूषण पाटील, राजेंद्र कांबळे, शितल सदलगे भाऊसाहेब पवार वकील, विकास खेराडकर, नामदेव पठाडे, रामचंद्र पाटील, सचिन चव्हाण, जाॅन्सन मद्रासी, किरण देवकुळे, मौलाली वंटमुरे, अरुण पळसुले, सीमा कुलकर्णी, शमशाद व जन्नत नायकवडी, विठ्ठलराव काळे, प्रमोद आवळे, प्रशांत अहिवळे, विश्वास यादव, संजय नायर, आयुब निशाणदार, डॉ. जिनेश्वर यलिगौंडा, डी. पी. बनसोडे, अशोकसिंग राजपूत काँग्रेस कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.