Sangli Samachar

The Janshakti News

मुस्लिम तरुणाशी विवाह केलेल्या आपल्या बहिणीबद्दल नाना पाटेकर यांची भूमिका चर्चेत !


सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. २४ जून २०२४
नाना पाटेकर ! एक असे नाव... ज्यांनी हिंदी मराठी चित्रपटांमध्ये आपल्या उत्तुंग अशा अभिनयाने स्वतःचे एक आगळे वेगळे स्थान तर निर्माण केलेच, पण... 'नाम फाउंडेशन' च्या मार्फत त्यांनी केलेले कार्य हिमालयाच्या उंचीचे मानायला हवेत. आपल्या वादग्रस्त वक्तव्याने आणि रोखठोक भूमिकेमुळे ते नेहमीच चर्चेच्या केंद्रस्थानी राहिले आहेत.

नाना पाटेकर यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमुळे ते पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. नाना पाटेकर यांच्या बहिणीने काही वर्षांपूर्वी एका मुस्लिम तरुणाशी विवाह केला. त्यावेळी त्यांच्या घरात मोठे वादळ निर्माण झाले होते. आई वडील तसेच दोन्ही भावांनी बहिणीशी संबंध तोडले. परंतु आपण मात्र बहिणीच्या पाठीशी राहिल्याचे नाना पाटेकर यांनी या मुलाखतीत सांगितले.


याबाबत बोलताना नाना पाटेकर म्हणाले की, माझी बहीण व तिचा पती दोघेही डॉक्टर आहेत. दोघेही एकमेकांवर आजही प्रेम करतात, त्यांचा संसार उत्तम सुरू आहे. मग येथे धर्म कुठून आला ? उलट मी तर म्हणेन माझी बहीण माझीच राहिली, पण आम्हाला एक 'अब्बास' मिळाला.

क्रांतिवीर चित्रपटात नाना पाटेकर यांनी सादर केलेल्या एका प्रसंगाची यानिमित्ताने आठवण होते. एका हिंदू व एका मुस्लिम व्यक्तींची बोटे चेचून, त्यांचे रक्त आपल्या हातावर घेत... " अब बताओ इसमे हिंदू का खून कौन सा है और मुस्लिम का कौन सा ?" हा त्यांचा डायलॉग त्यावेळी खूप फेमस झाला होता.