| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ४ जून २०२४
शिक्षण संस्थानी देशाच्या विकासामध्ये दिलेले योगदान हे अनन्य साधारण आहे. शिक्षण क्षेत्राचे खाजगीकरण होताना त्यामध्ये अनेक समस्या येतील असे वाटत होते. पण या संस्थांनी त्याला पुर्णपणे छेद दिला असून शिक्षण क्षेत्राचे पावित्र्य कायम राखत या क्षेत्राची उंची वाढविण्यात या संस्थांनी मोलाचे योगदान दिल्याचे मत सांगली जिल्हा शिक्षण संस्था संघाचे अध्यक्ष श्री. रावसाहेब जिनगोंडा पाटील यांनी व्यक्त केले.
नुकतेच सांगली जिल्हा शिक्षण संस्था संघाच्या कार्यकारी मंडळाची निवड प्रक्रिया पुर्ण झाली. त्यामध्ये नुतन पदाधिकाऱ्यांची निवड झाली. त्यांचा सत्कार कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्थेच्यावतीने येथील सभागृहात संपन्न झाला.
स्वागत व प्रास्ताविक संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अनिल श्रीपाल मगदूम यांनी केले. यावेळी शिक्षण संस्था संघाचे नुतन अध्यक्ष श्री. रावसाहेब जिनगोंडा पाटील कार्याध्यक्ष प्राचार्य आर.एस. चोपडे, सचिव श्री. विनोद पाटोळे, खजिनदार श्री. शशिकांत राजोबा, उपाध्यक्ष श्री. नितीन खाडीलकर, उपाध्यक्ष श्री. अरुण दांडेकर, संघटक श्री. वैभव गुरव, सहसचिव श्री. शिवपुत्र आरबोळे. सहसचिव श्री. एस.के. होर्तीकर, सांगली मिरज कुपवाड शहर अध्यक्ष प्रा.एम. एस. रजपूत, मिरज तालुका अध्यक्ष श्री. प्रशांत चव्हाण यांचा सत्कार संचालकांच्यावतीने संपन्न झाला.
नुतन संचालक ॲड. धैर्यशिल पाटील, श्री. सुहास पाटील, श्री. एस. के. पाटील, श्री. बाहुबली कबाडगे, श्री. हरीदास शिंदे, श्री. भारत दुधाळ, श्री. दिग्वीजय चव्हाण, श्री. एन. डी. बिरनाळे यांना देखील त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
या कार्यक्रमास संस्थेचे संचालक ॲड. एस.पी. मगदुम, डॉ. रमेश ढबू, श्री. ओ. के. चौगुले (नाना) . श्री. वसंतराव नवले, डॉ. एस.बी. पाटील मोटके, डॉ. चेतन पाटील, संचालिका श्रीमती भारती चोपडे सौ. चंदन नरेंद्र केटकाळे, तज्ञ संचालक डॉ. नरेंद्र खाडे, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अनिल मगदुम यांच्यासह, शाखा सल्लागार, विविध संस्थांचे पदाधिकारी सेवक हजर होते. आभार संस्थेचे व्हाईस चेअरमन डॉ. अशोक आण्णा सकळे यांनी मानले.