सांगली समाचार वृत्त |
नवी दिल्ली - दि. २४ जून २०२४
आम्ही अध्यक्षाच्या पॅनलवर विरोधकांनी बहिष्कार टाकत आगामी पाच वर्षांत मोदी सरकारला सुखाने कारभार करू द्यायचा नाही असा संदेश जणू इंडिया आघाडीने यातून दिला असल्याची चर्चा राजकीय क्षेत्रात सुरू आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारचा तिसरा कार्यकाळ सुरू झाला आहे. या सरकारचे पहिले अधिवेशन आजपासून सुरू झाले. परंतु या पहिल्याच अधिवेशनात बहिष्कारास्त्र सोडून, मजबूत झालेल्या विरोधकांनी सरकारला धक्का दिला आहे. अधिवेशनापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात सर्वांना सोबत घेऊन जात जनतेसाठी काम करण्याचा संकल्प सोडला, परंतु या बहिष्कार मुळे या संकल्पाला देण्याचे काम इंडिया आघाडीने केले आहे.
हंगामी अध्यक्षाच्या पॅनलवर काँग्रेसचे के. सुरेश, टीएमसीचे सुदीप बंडोपाध्याय, आणि डीएमके चे टी आर बालू यांचे केली होती. परंतु या तिघांनीही पॅनलवर बहिष्कार टाकला आहे. पॅनलचे हे तीन सदस्य हंगामी अध्यक्षाला मदत करणार नाहीत, ते नवीन खासदारांना शपथ देणार नाहीत. याचे कारण सांगताना या सदस्यांनी म्हटले आहे की हे बॅनर नवीन खासदाराला शपथ देण्यासाठीच तयार केले आहे. त्याला इतर कुठलाही अधिकार नाही. वैधरित्या लोकसभा अध्यक्ष निवडीनंतर पुन्हा नवीन पॅटर्न बनवले जाणार आहे. त्यामुळे या मर्यादित अधिकाराच्या पॅनलवर राहण्यात आपणास कोणतेही स्वारस नाही. दरम्यान संसदेचे काम सुरू होण्यापूर्वी हातात संविधान घेऊन इंडिया आघाडीच्या नवनिर्वाचित खासदाराने आंदोलन केले.
विरोधकांनी पॅनलवर बहिष्कार घातलेला असला तरी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, तालिकाध्यक्ष राधा मोहन सिंह यांनी मात्र खासदार पदाची शपथ घेतली. नरेंद्र मोदी शपथ घेतल्यानंतर भाजपच्या खासदारांकडून टाळ्यांच्या गजरात त्यांचे अभिनंदन केले. महाराष्ट्रातील पाच मंत्री नितीन गडकरी, पियुष गोयल, प्रतापराव जाधव, रक्षा खडसे आणि मुरलीधर मोहोळ हे आज शपथ घेणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्या कार्यकाळाची सुरुवात करीत असताना संपूर्ण देशाचे या पहिल्या अधिवेशनाकडे लक्ष लागून राहिले आहे. याच अधिवेशनात देशाचा अर्थसंकल्प मांडण्याची शक्यता असून, त्या दृष्टीने हे अधिवेशन अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे विरोधकांनी मोदी सरकारला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.