Sangli Samachar

The Janshakti News

सांगलीकरांचा नादच खुळा... रस्ता नाही, पण दिमतीला लाखोंच्या गाड्या !


सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २९ जून २०२४
सांगलीची वाहतूक ही एखाद्या ज्वालामुखीच्या मुखावर वसल्यासारखे झाली आहे. सांगलीतील अरुंद रस्त्याच्या पार्श्वभूमीवर लोकसंख्येच्या मानाने वाहनांची संख्या अधिक झाली आहे. पुणे मुंबई इतकीच सांगलीची ही वाहतूक व वाहने पादचाऱ्यांसाठी डोकेदुखी वाहत आहे.

मध्यंतरी एका पोलिस अधिकाऱ्याने सांगलीकर यांचे कान टोचले होते. "इथल्या वाहनधारकांना ट्राफिक सेन्स नाही !" हे त्याचे बोल नागरिकांना पदोपदी पडतात. सध्या सांगलीत नव्या व जुन्या वाहन खरेदीधारकांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याचे पहावयास मिळते आहे.


एका वृत्तानुसार दररोज 200 हून अधिक वाहने रस्त्यावर नव्याने येत आहेत. नुकत्याच केलेल्या पाहणीमध्ये सांगलीमध्ये 22 हजार 275 दुचाकींची विक्री झाली आहे त्या खालोखाल कारची विक्री असून ती 4156 असून त्यानंतर मालवाहतूक रिक्षांची संख्या आहे. गेल्या पाच महिन्यात तब्बल 29 हजार 740 गाड्यांची विक्री झाल्याचे आरटीओ ऑफिस मधून सांगण्यात आले. 

या साऱ्या गाड्यांच्या विक्रीमध्ये आलिशान कडेंचाही समावेश आहे 20 लाखांच्या पुढील किमतीच्या जवळपास 200 च्या आसपास वाहनांची नोंद झाली आहे. 

एकीकडे शहरातील अपुरे रस्ते, त्यावर ती विक्रेते आणि दुकानदारांनी केलेले अतिक्रमण याचा विचार करता सांगलीचा कोंडत चाललेला श्वास अजून किती गंभीर समस्या निर्माण करतो हे येणारा काळच सांगेल.