Sangli Samachar

The Janshakti News

रोहित शर्माला पत्रकाराचा तिरकस प्रश्न आणि रोहितचं जबरदस्त उत्तर !


| सांगली समाचार वृत्त |
बार्बाडोस - दि. ३० जून २०२४
काल बार्बाडोसच्या क्रिकेट मैदानावर भारतीय संघाने इतिहास घडविला. तब्बल 17 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने टी ट्वेंटी क्रिकेटचा विश्व कप उंचावला आणि भारतीयांची मानवी तितक्याच गौरवाने उंचावली गेली.

रोहित शर्मा याच्या खेळावर अनेकदा प्रश्नचिन्ह उमटले होते. परंतु कालच्या सामन्यात त्याने आपल्या नेतृत्वाच्या जोरावर विरोधकांची तोंडे बंद केली. परंतु विजयाचा आनंद साजरा केल्यानंतर तो पत्रकारांसमोर उपस्थित झाला, आणि पत्रकारांच्या एका प्रश्नाने, रोहित शर्माने उपस्थितांसह त्याची लाईव्ह पत्रकार परिषद पाहणाऱ्या चाहत्यांची मने जिंकली...

रोहित शर्मा हा त्याच्या हजरजबाबी उत्तरासाठी आणि सामना सुरू असताना घडणाऱ्या पिस्त्यांसाठी तो कायम चर्चेत असतो. एका पत्रकारांनी त्याला प्रश्न विचारला...
" चांगुलपणावर विश्वास ठेवणं कठीण आहे का ? आणि चांगल्या लोकांसोबत नेहमी चांगलंच घडणं आवश्यक आहे का ? त्यामध्ये तुम्ही असो संघ असो तेव्हा राहुल द्रविड... राहुल स्मितहास्य करत उत्तर दिलं,

" हो आवश्यक आहे. मला वाटतं जे लिहिलेलं असतं ते होतंच. मात्र एक गोष्ट आहे ते म्हणजे तुम्हाला ते माहीत नसतं. वर्ल्ड कप जिंकणार हे लिहिलेलं होतं, पण ते आम्हाला माहीत नव्हतं.
आणि हाच तर गेम आहे. आम्हाला जर माहित असतं की आम्ही वर्ल्ड कप जिंकणार आहोत तर आम्ही सर्वजण आरामशीर मैदानात आलो असतो आणि निवांत खेळलो असतो... पण..."

रोहित शर्माच्या उत्तराने तिथे उपस्थित असलेल्यांना आपले हसू आवरता आले नाही. असा हा रोहित शर्मा आणि त्याचं अफलातून उत्तर...