| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १३ जून २०२४
ज्याप्रमाणे एखाद्या कलेमुळे कलाकाराची प्रसिद्धी होते, तद्वत एखाद्या कलाकारामुळे कलेलाही प्रसिद्धी मिळू शकते. तैलचित्र म्हटलं की पूर्वीच्या राजा रविवर्मापासून अलीकडच्या एम्. एफ्. हुसैनपर्यंतची नावे डोळ्यासमोर तरळतात. आपल्या सांगलीतही तैलचित्रांबाबत अनेक नावे सुपरिचित आहेत यामध्ये पूर्वीच्या काळातील कलाभुवनचे स्व. धर्माधिकारी बंधू, स्व. आण्णासाहेब चौगुले, स्व. सुरेश सन्मुख, श्री. सुरेश पंडित, श्री. बाळासाहेब पाटील, श्री. सूर्यकांत देवळेकर अशी अनेक नावे आठवल्याशिवाय राहात नाहीत. तसंच रांगोळी म्हटलं की, प्रामुख्याने प्रमोद आर्वी, राहुल कळंबटे, वीरेश वाणी ही नावे आपसुक आठवतात.
आपल्या सांगलीतील असेच एक सुपरिचित रंगोलीकार... विवेक विश्वनाथ जोशी. रांगोळी कलेतील एकलव्य.
जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा...
थोडीशी तांत्रिक माहिती...
वरील लिंकवर क्लिक केल्यानंतर आपणांसमोर मुखपृष्ठ येईल. यानंतर आपण वाचण्यासाठी ज्याप्रमाणे नेहमीची पुस्तकाची पाने पलटतो, तसेच या क्लिप बुकचीही पाने पलटून आपणास मजकूर वाचता येईल...
या पुस्तकातील मजकूर वाचण्यासाठी आपण समोरील पान हवे तितके एनलार्जही करू शकता... पण पुढील पानावर जाण्यासाठी, समोरील पानावर दोनदा क्लिक करावे. म्हणजे पुस्तकाचे पान पूर्ववत होईल. आणि मग समोरील पान पलटून, पुढील पानावर जाता येईल...
चला तर मग आपल्या मित्राची कहाणी वाचण्यासाठी या क्लिप बुक मध्ये प्रवेश करूया...
आणि हो हे क्लिप बुक व मित्राची कहाणी आपणास कशी वाटली, हे सांगण्यासाठी
9860837065
या फोनवर संपर्क साधण्यास विसरू नका...
धन्यवाद !