| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २१ जून २०२४
विजयनगर सांगली येथील अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या ऑफिस मधली पाच पैकी चार कर्मचारी महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक बोर्डाने व राज्य सरकारने कपात केल्याची माहिती समजते. मराठा समाजातील तरुणांसाठी व्याज परतावा योजना राबवणाऱ्या या अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ असून यामध्ये पाच कर्मचारी होते ते आधीच्या कामकाजावरून ही संख्या अपुरी होतीच. या पाच पैकी चार कर्मचाऱ्यांची कपात करून मराठा समाजाच्या तरुणांची चेष्टा राज्य सरकारने केली आहे असे दिसून येते.
जर सांगलीच्या जिल्हाधिकारी व महामंडळाच्या अध्यक्षांनी व राज्य सरकारने लवकरात लवकर अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ सांगली या शाखेसाठी पाच पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांची भरती न केल्यास अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या ऑफिसमध्ये जाऊन ऑफिसला कुलूप लावण्यात येईल असा इशारा मराठा स्वराज्य संघाचे राज्य प्रवक्ते माननीय संतोष पाटील यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे.