yuva MAharashtra सांगली शहरजिल्हा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून रुग्णांना मोफत श्रवण यंत्राचे वाटप !

सांगली शहरजिल्हा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून रुग्णांना मोफत श्रवण यंत्राचे वाटप !


सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २४ जून २०२४
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त अविरतपणे सुरू असलेल्या महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष मा.संजयजी बजाज साहेब व युवक शहर जिल्हाध्यक्ष मा.राहुलदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली व स्वर्गीय घनशामशेठ बजाज चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून सांगली येथे आ.जयंत पाटील साहेब यांच्या हस्ते रुग्णांना श्रवणयंत्रे मोफत वाटप करण्यात आले

आमदार जयंत पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त अखंडपणे चालू असलेल्या रुग्णसेवेच्या अंतर्गत ज्या लोकांना ऐकण्याचे प्रमाण कमी आहे किंवा ज्यांना कायमचा बहिरेपणा आहे अशा लोकांना शासनामार्फत मिळणारे श्रवणयंत्र मिळवण्याकरता खूप प्रयत्न करावे लागतात त्यासाठी त्यांना एक ते दोन दिवस सरकारी इस्पितळात ऍडमिट व्हावे लागते ते करून सुद्धा श्रवणयंत्र फार कमी रुग्णांना मिळत असते 

 ही गोष्ट माननीय संजय बजाज साहेब यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी स्वतःच्या खर्चातून श्रवणयंत्रे उपलब्ध करून दिली , काल पंधरा रुग्णांना आ. जयंत पाटील साहेब यांच्या हस्ते हे श्रवणयंत्रे देण्यात आलीत


 ही श्रवणयंत्रे देण्यासंदर्भात मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य पक्षाचे सांगली शहरजिल्हाध्यक्ष संजय बजाज साहेब युवक शहरजिल्हाध्यक्ष राहुलदादा पवार ,आसिफभाई बावा ,युसूफभाई जमादार ,निलेश शहा यांनी केले तसेच पक्षाचे आरोग्यदूत उमर गवंडी यांनी यासाठी विशेष पाठपुरावा केला

यावेळी सांगली विधानसभा क्षेत्र अध्यक्ष सचिन जगदाळे ,सांगली शहराध्यक्ष सागरदादा घोडके ,हरिदास पाटील ,समीर कुपवाडे ,उत्तम कांबळे ,धनपाल खोत, डॉ शुभम जाधव ,महालिंग हेगडे ,डॉ पृथ्वीराज पाटील ,संजय सरवदे, गब्रियल तिवडे, किशोर हत्तीकर ,अर्जुन कांबळे,संगिता जाधव, अनिता पांगम ,वंदना चंदनशिवे,प्रियांका विचारे ,वैशाली धुमाळ ,संध्या आवळे, कुमार वायदंडे, फिरोज मुल्ला, शीतल खाडे ,बालम मुजावर, नितीन माने ,मुन्ना शेख, दत्ता पाटील ,घनश्याम थोरात,इमानुयल मद्रासी, असीम फकीर यांच्या सेल चे प्रमुख पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.