| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. २१ जून २०२४
इंग्रजी असो मराठी असो किंवा सेमी इंग्रजी. सकाळी नऊ पूर्वी शाळेचे घंटा वाजली, अर्थात शाळा सुरू झाली तर अशा शाळांवर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा शिक्षण विभागाने घेतल्याने शैक्षणिक क्षेत्रात खळबळ माजली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की लहान मुलांची झोप अपूर्ण राहिल्याने त्यांना व शाळांनाही अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते. त्यामुळे शिक्षण तज्ञांच्या सल्ल्यावरून इयत्ता चौथी पर्यंतचे वर्ग सकाळी नऊ नंतर सुरू करावेत असा जीआर प्रसिद्ध करण्यात आला होता. परंतु या जीआर ला अनेक शाळांनी केराची टोपली दाखवली. आणि पूर्वीप्रमाणेच सकाळी नियमित वेळेत शाळा सुरू करण्यात येत आहेत.
शिक्षण विभागाच्या नुकत्याच पार पडलेल्या ऑनलाईन बैठकीत इतर विषयाबरोबरच शाळेच्या वेळेबाबतही चर्चा झाली. तेव्हा व्यवस्थापनाने पालक व विद्यार्थी वाहतूक वाहन चालक-मालक संघटना यांचा असलेला विरोधाचे कारण समोर केले आणि पूर्वीप्रमाणेच शाळा सुरू करण्याची वेळ सकाळी सातची असावी असे निदर्शनास आणले. तेव्हा सकाळी नऊ पूर्वी शाळा भरवायचे असल्यास संबंधित शाळांनी सबळ कारण देऊन शिक्षणाधिकाऱ्यांची रीतसर परवानगी घ्यावी, असाच पर्याय समोर आला. परवानगीशिवाय सकाळी पूर्वी नऊ वाजण्यापूर्वी ज्या शाळा सुरू होतील कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येतील असा इशारा देण्यात आला आहे.