| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ३० जून २०२४
जनसेवा ही ईश्वर सेवा म्हणून कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांचे आपल्याकडे वाणवा नाही. अशा पैकीच एक म्हणजे, सुप्रसिद्ध गायक व समाजसेवक सुरेश गरड. काही दिवसापूर्वी त्यांच्या रहिवासी भागातील एक आजी. श्रीमती बनाबाई खिलारे वय वर्ष (८०). या आजीबाईंना मूल ना बाळ. इतरांच्या सहकार्याने एकट्याच आपले उदरनिर्वाह करीत होत्या. ३ जून रोजी त्यांचा पाय फ्रॅक्चर झाला. तेव्हा गरड यांना माहिती मिळताच त्यांनी आपल्या मित्राच्या सहकाऱ्यांनी आजीबाईंना सांगलीतील शासकीय रुग्णालयात दाखल केले.
अनाथ लोकांना ॲडमिट करताना पोलीस नोंद होते, तशी नोंदही झाली. आजीचा पाय फ्रॅक्चर असल्याने एका पायाचे ऑपरेशनही दुसऱ्या दिवशी झाले. आज शनिवार २९ जून २०२४ रोजी आजीला डिस्चार्ज मिळाला. आजी एकदम खडखडीत झाली. सुमारे २६ दिवस आजी दवाखान्यात होती.
सुरेश गरड हे दररोज आजीकडे जाऊन धीर देत विचारपूस करून आणि जे मागेल ते खायला दिल्याने आजी एकदम खुश होती. डिस्चार्ज मिळाल्यावर तिला खूप आनंद झाला. त्यांना
कुपवाड वृद्धाश्रम अथवा मिरजेतील वृद्धाश्रमामध्ये पाठवायचा बेत होता. तत्पूर्वी आजी म्हणाली. नागज फाट्याच्या पुढे जुनोनी गावा जवळ दुधारपूर येथे माझी बहीण राहते मला तिकडे पाठवा.
मग १५०० रुपये देऊन एक रिक्षा ठरवली आणि त्या रिक्षातून आजीला तिच्या बहिणीकडे पाठवले. प्राणी, पशु- पक्षी आणि मनुष्य सेवेबद्दल हा जो उमाळा निर्माण होतो तो उमाळा परमेश्वरच आपल्यात बळ देऊन निर्माण करत असतो. अशी प्रतिक्रिया यावेळी सुरेश गरड यांनी दिली. आणि या परमेश्वराला देखील हेच मागणं आहे की, अखेरच्या श्वासापर्यंत सतत सेवाभावी वृत्तीने कार्य करण्याची प्रबळ इच्छा आणि शक्तीही व्यक्त केली.