Sangli Samachar

The Janshakti News

अशीही गुरूदक्षिणा !...


सांगली समाचार वृत्त |
सातारा - दि. २८ जून २०२४
ती मल्लपुरम केरळमध्ये गणिताची शिक्षिका होती. एके दिवशी तिच्या विद्यार्थिनीने तिला रेल्वे स्टेशनजवळ भीक मागताना पाहिले पण तिला नीट ओळखले नाही. पण नंतर तिच्या लक्षात आले की ती स्त्री आपली वर्गशिक्षिका आहे.

जेव्हा ती तिच्याशी बोलली तेव्हा ती म्हणाली की, मी शाळेतून निवृत्त झाल्यानंतर माझी मुले मला सोडून गेली आणि तेव्हापासून मी बेघर आहे. त्यामुळे मी रेल्वे स्थानकासमोर भीक मागून जगते आहे. 

विद्यार्थिनीने रडत रडत तिला घरी नेले आणि चांगले कपडे, जेवण दिले आणि तिची राहण्याची सोय केली. त्यानंतर तिने तिच्यासोबत शिकणाऱ्या प्रत्येक शाळेतील मित्रांशी संपर्क साधला. आणि तिला राहण्यासाठी चांगल्या ठिकाणी नेले. तिची स्वतःची मुले तिला सोडून गेली पण ज्या मुलांना तिने शिकवले त्यांनी तिला सोडले नाही. पुढे दर महिन्याला तिच्या खर्चासाठी हे विद्यार्थी काही ठराविक रक्कम आपल्या शिक्षकांसाठी पोहोच करीत होते.


"हेच गुरु शिष्य परंपरेचे मोठेपण आहे."

सध्याच्या गुरु शिष्यामधील नात्याच्या पार्श्वभूमीवरील वरील पोस्ट खूप काही सांगून जाते. आज-काल गुरु शिष्याच्या नात्याला काळीमा फासणा-या अनेक घटना आपण वृत्तपत्रातून, सोशल मीडियातून वाचतो. त्यावेळेला आपण संबंधितांना लाखो ही वाहतो. अर्थात आपल्या शिक्षकी पेशाला परमेश्वराचा दर्जा देऊन देशाच्या भावी पिढीला केवळ पुस्तकातीलच नव्हे तर जगात कसे वापरायला हवे याचे व्यावहारिक शिक्षणही शिक्षकही कमी नाहीत. 

मध्यंतरी बदली झालेल्या शिक्षकाला निरोप देताना भावनिक झालेल्या विद्यार्थी विद्यार्थिनी यांचा फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल झाला होता. शिक्षक विद्यार्थ्यातील ही आपुलकी कशातून निर्माण झाली ? वरील केरळमधील घटना असो किंवा बदली झालेल्या शिक्षकाला निरोप देताना भावनेर झालेल्या विद्यार्थ्यांची घटना असो, विद्यार्थी शिक्षक संबंध कसे असावेत, हे याचे बोलके उदाहरण आहे. खरंतर शिक्षकांनीही याचा आदर्श घ्यायला हवा.