Sangli Samachar

The Janshakti News

चंद्रकांत दादा ठरले 'रावडी राठोड' ! मुलींच्या उच्च शिक्षणाचा शब्द करून दाखवला खरा !


सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. २६ जून २०२४
अक्षयकुमारचा राउडी राठोड हा चित्रपट त्यामधील डायलॉगमुळे खूप गाजलेला होता. यातीलच एक डायलॉग म्हणजे, " जो मैं बोलता हॅ, वो मैं करता हॅ |" महाराष्ट्राचे वरिष्ठ मंत्री आणि भाजपचे तारणहार चंद्रकांत दादा पाटील हेही सध्या रावडी राठोड बनल्याची चर्चा भाजपा प्रेमी मधून ऐकायला मिळत आहे.

मध्यंतरी पुणे येथील एका जाहीर कार्यक्रमात त्यांनी यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून मुलींसाठी उच्च शिक्षण मोफत करण्याची घोषणा केली होती. परंतु शैक्षणिक वर्ष सुरू होऊन महिन्याभराचा काळ लोटला तरी याबाबतचा जीआर निघू शकलेला नव्हता. याचे कारण लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता हे होते. मात्र विरोधकांनी याचे भांडवल करून, 'चंद्रकांत दादांनी शब्द फिरवला !' अशी टीका केली होती.


लोकसभेचे आचारसंहिता संपताच, चंद्रकांत दादांनी वरिष्ठ पातळीवर हालचाली करत, मुलींसाठी उच्च शिक्षण मोफत करण्या बाबतचा जीआर काढण्याची तयारी केली आहे. कारण उद्या हा जीआर अधिकृतरित्या जाहीर होईल. आणि याच वर्षापासून आता मुलींना उच्च शिक्षण मोफत मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे. अर्थातच महायुतीमार्फत आगामी विधानसभा निवडणुकीत हा मुद्दा गाजणार हे नक्की.