सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २४ जून २०२४
इंग्रजी भाषेला वाघिणीचे दूध असं संबोधलं गेलं असलं तरी, मराठी भाषेची श्रीमंती कमी होत नाही. या भाषेतील अनेक शब्द थेट हृदयाला जाऊन भिडतात. आपल्याकडे दर दीड कोसावर मराठी भाषा बदलत असते. आणि त्या त्या परिसरातील अनेक शब्द या मराठी भाषेत समाविष्ट होत असतात. हे शब्द कानावर पडले की त्याची गोडी लक्षात येते. परंतु असेही काही मराठी शब्द आहेत, जे कालौघात एक तर कमी झाले आहेत किंवा काळाच्या पडद्याआड तरी गेले आहेत. अशाच विसरत चाललेले हे काही शब्द आमच्या मराठी प्रिय वाचकांसाठी...
तांबडं, कडूसं, येरवाळी, इदुळा, आवसं, पारुख, घटका, पळे, औंदा, यंदा, परूस, टिच, इत, हात, वाव, काखवाव, मैल, फर्लांग, मोगली, कुड, बारव, आड, कनिंग, कनगुलं, डुरकुलं, झाप, डालगं, दुरडी, परडी, टोपलं, तिकाटनं, मेडकं, आडू, वलन, वासा, भानुसा, खुराडा, आंगण, वटा, रांजण, सारवण, पोतारा, वळचण, पागोळ्या, कलवड, सूरपारंबा, विटी-दांडू, लोम्पाट, हुतुतू, शिवनाभानी, दस्ताडपुगडं, लंगडी, जिबल्या, चुळचुळमुंगळा, आकरा टोकरा, आईचं पत्र हरवलंय, माचाळ, पोहरा, कोरड्यास, कालवण, घासलेट, टकूचं, कुंची, शेलकाट, पैरण, बाराबंदी, आंगरटं, छाटण, मुडासं, पटका, टोपी, लुगडं, चोळी, पोलकं, फडका, गवन, कांबळ, वाकळ, घोंगडं, लेपाटं, पासोडी, रकटं, चादर, वाकी, मासोळी, बाळी, भिकबाळी, बुगडी, बिंदली, कुडकी, वजरटीक, सर, कमरपट्टा, करदुडा, तोडा, वाळा, औत, कुळव, फरांडी, डुबं, तिफण, चाडं, नळं, जानवळं, इळत, इडी, दिंड, फाळ, फारुळं, रुमणं, शीवळ, जु, कुरडिकं, खिळ, सापती, कुळव, पास, दातुळ, काडवान, आवूड, बराड, काकरी, मुरडान, तास, आडतास, वसान, दोरकांड, दावं, कानी, कासरा, चऱ्हाट, चिलबल, बिरडं, येटान, बुटयेटान, आक्री, आक, तुंबा, आरा, पुट्टा, कुनी, धाव, डोंबाळा, घोडकं, ढकली, खुटला, पाटली, शिड्या, मुंगा, खोडकी, ढोणगी, चारबैली, सहाबैली, हाताळी, वेसण, म्होरकी, चौरी, माचाटी, झुली, मुंगसं, चावऱ्या, छकडा, नळा, राखोळी, वळती, आटोळा, गोफण, पिचका, बुजगावणं, कुडी, गांजवा, चुकारी, उतार्या, अर्धली, करडू, ताटली, परात, तंबुलं, लोटकं, तवली, भगोनं, हांडा, घंगाळं, चरवी, गुंडगी, चमचा, वग्राळं, पळी, चाटू, कावळा, वाडगा, परात, पितळी, वाटी, तांब्या, पेला, गडू, गडवा, चंबू, किटली, खिसनी, गाळणी, शेवगा, झाऱ्या, सांडशी, चिमटा, काठवट, बेलणं, उखळ, ठोंबा, मुसळ, सूप, जातं, खुटा, पाटा, वरवंटा, कंदिल, चिमणी, टाक, दौत, शाई, पत्र, टिप कागद, इळा, खुरपं, कोयतं, नारगत, भाला, खलबत्ता, शेम्ब्या, झूल, वाळंन, फुकारी, दिवळी, फरताळ, तुळई, किलचान, हालकडी, आडू, सवनं, माचाड, वरवटा, बाजवा, आड्याळं, दंड्याळं, लाखान, मिट्या, आसूड, इळत, वडवान, मोट, नाडा, सोंदुर, चाक, कणा, कणंपट्टी, चाकपट्टी, फावडं, घमेलं, कुऱ्हाड, कुदळ, सांगुळा, थारुळा, हौद, हेळ, मोगळा, पाचुंदा, पलान, दंड, आटवनी, आवातनं, न्याहारी, वानवळा, भलरी, काढणी, मळणी, बडवणी, बुचाड, खळं, माजनं, ढवरा, भंडारा, रास, मदान, वावडी, हातनी, वाफा, सरी, वरंबा, सारा, वसारी, आमुनं, इर्जिक, सांगड, पैरा, शेम्ब्या, झूल, चंगाळं, फुकारी, मोगा, मोरवा, झाकणी, सुगाड, शेर, आटवा, चिपटं, मापटं, कोळवं, नीळवं, खंडी, मण,पसा, वंजळ, भारा, उतरंड, ढेपन, आळी, चावडी, गावपांढर, शीव, गावकूस.
विचार करा यातील किती शब्द आजकल वापरले जातात व आपल्या पुढील पिढी पर्यंत किती शब्द पोचतील.