yuva MAharashtra नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर नव्या लूकमध्ये; सोशल मीडिया प्रोफाइलमध्ये केला 'हा' मोठा बदल !

नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर नव्या लूकमध्ये; सोशल मीडिया प्रोफाइलमध्ये केला 'हा' मोठा बदल !



| सांगली समाचार वृत्त |
नवी दिल्ली - दि. १३ जून २०२४
नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा भारताच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली आहे. तिसऱ्यांदा शपथ घेत मोदींनी हॅटट्रीक साधली आहे. मोदींच्या शपथविधी सोहळ्याला अनेक देशांच्या प्रमुखांनी उपस्थिती लावली आहे. शिवाय, एनडीएतील घटक पक्षांसह देशाभरातील खासदार आणि बॉलिवडू सेलिब्रिटींनी पीएम मोदींना शुभेच्छा दिल्या आहेत. राष्ट्रपती भवनात मोदींचा शपथविधी सोहळा पार पडला आहे. दरम्यान निवडणुकांच्या रणधुमाळीत सर्वच राजकीय पक्षांनी नवीनवीन प्रचारतंत्र वापरण्यास सुरुवात केली आहे, यात सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात प्रचार करण्यात आला. दरम्यान आता नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्यानंतर त्यांच्या सोशल मीडियावरील प्रोफाइलमध्ये मोठा बदल केला आहे.

लोकसभा निवडणुकीत एनडीएला बहुमत मिळाल्यानंतर नरेंद्र मोदींनी ९ जून रोजी पंतप्रधान पदाची शपथ घेतली. या सोहळ्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी परदेश दौऱ्यावर रवाना होणार आहेत. तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर नरेंद्र मोदी यांचा हा पहिलाच परदेश दौरा असून ते इटलीला जाणार आहेत. इटलीमध्ये जी ७ शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आलेले असून या शिखर परिषदेमध्ये ते सहभागी होणार आहेत. याआधी पंतप्रधान मोदी यांच्या एक्स अकाऊंटमध्ये बदल करण्यात आला आहे.


मोदींनी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर सोशल मीडियावरील आपले प्रोफाइल फोटो बदलले आहेत. मोदींच्या अधिकृत ट्वीटर हॅण्डलवरील कव्हर फोटोही बदलला असून शपथविधीनंतरचा संपूर्ण मंत्रीमंडळाचा फोटो त्यांनी कव्हरला ठेवला आहे. आपला प्रोफाइल फोटोही मोदींनी बदलला असून पिवळ्या मोदी जॅकेटमधील नवा प्रोफाइल फोटो त्यांनी ठेवला आहे.

इटलीत होणाऱ्या जी ७ शिखर परिषदेत अमेरिका, फ्रान्स, इटली, जर्मनी, कॅनडा, जपान, ब्रिटन या देशाच्या प्रमुख नेत्यांचा सहभाग असणार आहे. यावेळी जी ७ शिखर परिषदेत रशिया आणि युक्रेन युद्धावर चर्चा होण्याची शक्यता आहे. याबरोबरच आदी जागतिक विषयांवरील मुद्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.