| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १२ जून २०२४
सांगली शहरातील शामरावनगरामधील मिळकत धारकांनी खुले भूखंड स्वच्छता करून घेऊन तात्काळ भरून घ्या अन्यथा त्यांच्यावर तात्काळ फौजदारी दाखल करण्याचे आदेश महापालिकेचे प्रशासक तथा आयुक्त शुभम गुप्ता यांनी अधिकाऱ्यांना दिले. नागरीकांना कोणताही त्रास होणार नाही याचीदक्षता प्रशासन घेईल अशी ग्वाही गुप्ता यांनी दिली. सततच्या पावसामुळे शामरावनगरात पावसाचे पाणी साचले आहे, अनेक मोकळ्या भुखंडावर पाणी साचले असुन आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. यातच काल संततधार पाऊस सुरु झाल्याने शामरावनगरात पाण्याचे तळे निर्माण झाले आहे.
या पार्श्वभूमिवर आयुक्त तथा प्रशासकीय अधिकारी शुभम गुप्ता यांनी नागरिक सदस्य अधिकाऱ्यांच्या समवेत शामराव नगर, रुक्मिणी नगर, डॉ एपीजे अब्दुल कलाम हायस्कूल परिसर आदी परिसरामध्ये सर्व नाल्याचे पाणी, खाजगी खुले भूखंड याची पाहणी केली आहे. यावेळी सामाजिक कार्यकर्ते मनोज भिसे, माजी नगरसेवक अभिजीत भोसले
रज्जाक नाईक, यांनी शामराव- नगरातील समस्यांविषयी चर्चा केली. तसेच नागरिकांनी परिसरातील समस्या बाबत आयुक्तांना माहिती दिली, अधिकारी यांच्या समवेत जागेवर पाहणी करून आयुक्तांनी उपाययोजना करणे कामी चर्चा करून निर्णय जागेवर घेतले आहे, त्यानुसार नियोजन सत्वर करून येत्या काही दिवसात पूर्तता करण्याच्या सूचना दिल्या आहेत. शामराव नगर परिसरातील खाजगी प्लॉट धारकांचे खुल्या भूखंडामध्ये पाणी साचून राहिलेले अशा मिळकत धारकांना खुले
भूखंड स्वच्छता करून घेऊन
तात्काळ भरून घ्यायचे आहे, जे करणारे नाहीत, त्यांच्या फौजदारी दाखल करण्याचे आदेश आयुक्त गुप्ता यांनी डॉ. ताटे यांना दिले. कुंठे मळा या परिसरातील साचून राहणारे पाणी निचरा होण्यासाठी उदय हॉटेल जवळ नाला मुख्य नालाला जोडून घेऊन पाणी निचरा करण्याची सोय करण्या कामी या वेळी सूचना दिल्या आहेत. नालेसफाई बाबत आयुक्त यांनी संबंधित विभागाचे उपअभियंता महेश मदने तसेच शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण, नगरअभियंता परमेश्वर हलकुडे यांना सदर प्रकरणी जे नाले सफाई केलेले आहेत त्याची खोली अधिक नाही
त्याची खोली अधिक प्रमाणात करून पाणी निचरा करण्यासाठी सूचना आयुक्तांनी दिल्या.
ज्या भागांमध्ये पाणी साचून राहतात आणि खाजगी प्लॉट धारक आहेत अशा सर्व खाजगी प्लॉट धारकांना तात्काळ प्लॉटमधील पाणी निचरा करून भरून घेण्याबाबत नोटीस देण्याचे आहेत. ज्याने प्रतिसाद दिला नाही त्यांच्यावर फौजदार दाखल करण्याची कारवाई सत्वर करण्याचे अशा सूचना देण्यात आहेत. शामराव नगर संदर्भात सोमवार पर्यंत हे सर्व कारवाई पूर्ण करून घ्या, याबाबत सूचना देऊन झालेल्या कामांमध्ये प्रगती तात्काळ निदर्शनास आणून देण्याचे आहे.