yuva MAharashtra संभाव्य मंत्र्यांसमवेत मोदींचे पंतप्रधान निवासात चहापान !

संभाव्य मंत्र्यांसमवेत मोदींचे पंतप्रधान निवासात चहापान !



| सांगली समाचार वृत्त |
नवी दिल्ली - दि. ९ जून २०२४
नियोजित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आपल्या समवेत शपथ घेणाऱ्या संभाव्य मंत्र्यांना पंतप्रधान पंतप्रधानांचे अधिकृत निवासस्थान सात लोक कल्याण मार्ग येथे चहापानासाठी बोलावले त्यांच्या समवेत नव्या सरकार संदर्भात चर्चा केली. यामध्ये राजनाथ सिंह, अमित शाह, नितीन गडकरी यांच्या समवेत मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांचा देखील समावेश होता. त्यामुळे शिवराज सिंह चौहान यांना नरेंद्र मोदी आपल्या मंत्रिमंडळात स्थान देऊन त्यांच्याकडे महत्त्वाचे खाते सोपविणार की त्यांना भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष पद मिळणार??, याविषयी राजकीय वर्तुळात उत्सुकता लागून राहिली आहे. 

नरेंद्र मोदींनी संसदीय नेतेपदी निवड झाल्याच्या भाषणात आपणाला मंत्री केल्या संदर्भात फोन आला तरी त्याचे प्रॉपर कन्फर्मेशन घ्या. कुठल्याही माध्यमांच्या रिपोर्ट्सवर विश्वास ठेवू नका. ब्रेकिंग न्यूज द्वारे देश चालत नाही. मंत्रिमंडळ बनत नाही,असा स्पष्ट इशारा दिला होता. त्यामुळे मंत्र्यांची नावे गुलदस्त्यातच राहिली होती.

परंतु, आज मोदींनी आपल्या संभाव्य मंत्र्यांना पंतप्रधानांचे अधिकृत निवासस्थान 7, लोककल्याण मार्ग येथे निमंत्रित करून त्यांच्या समवेत चहापान केले. त्याचवेळी त्यांनी सर्व नेत्यांची बातचीत केली यामध्ये निवडक नेत्यांनाच निमंत्रण देण्यात आल्यामुळे तेच मंत्री होतील अशा अटकळी माध्यमांनी बांधायला सुरुवात केली. यामध्ये वर उल्लेख केल्याप्रमाणे शिवराज सिंह चौहान यांचा समावेश होता. सध्या त्यांचे नाव भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी राजकीय वर्तुळात घेतले जात आहे. अर्थातच त्यांचे नाव भाजपच्या वरिष्ठ वर्तुळात समाविष्ट आहेच, पण त्यांना नरेंद्र मोदी केंद्रीय मंत्री पदाची जबाबदारी सोपं होणार की त्यांच्याकडे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष पद येणार??, याविषयी राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.


त्याचबरोबर पंतप्रधानांनी चहापानासाठी निमंत्रण दिलेल्या नेत्यांमध्ये पियुष गोयल, धर्मेंद्र प्रधान, राष्ट्रीय लोक दलाचे नेते जयंत चौधरी, मनोहर लाल खट्टर, सर्वानंद सोनवल गजेंद्र सिंग शेखावत, राव इंद्रजीत सिंग, सुकांता मुजूमदार, हर्ष मल्होत्रा, भगीरथ चौधरी, अजय टामटा, राजीव लल्लनसिंग, रामदास आठवले, संजय सेठ, जितीन प्रसाद, रवनीत सिंग बिट्टू, अनुप्रिया पटेल, किरण रिजीजू, चिराग पासवान, ज्योतिरादित्य सिंधिया, आदी नेत्यांचा समावेश होता. त्यामुळे या सगळ्यांचा मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता आहे.