| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १५ जून २०२४
सांगली शहराच्या विविध भागातील नागरिकांच्या समस्यांचा पृथ्वीराज पाटील यांनी महापालिका आयुक्तांसमोर पाढाच वाचला. आयुक्तांनी समस्याग्रस्त भागाला भेट देऊन समस्या निराकरणासाठी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना तातडीने आदेश द्यावेत अशी सांगली शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराजबाबा पाटील यांनी समक्ष केलेली मागणी आयुक्तांनी मान्य केली व लवकरच समस्या निराकरण करण्यात येईल असे सांगितले.
निवेदनातील महत्त्वाचे मुद्दे
- वार्ड नं. १२ मध्ये पूर्वी मंजूर असलेला ३० फूटी रस्ता ग्राह्य धरुन नकाशात नमूद ३० फूटी रस्ता हीच तरतूद अंतीम करुन संबधित नागरिकांना घर बांधणी परवाने द्यावेत.
- रेपे प्लाॅट क्षेत्रातील गटर बांधणी व रस्ता करणे ही कामे तातडीने पूर्ण करावीत
- शिंदे मळ्यातील ओपन स्पेस विकसित करावा. त्या ठिकाणी महापालिकेने डुकरे सोडण्याचे बंद करावे.
- वार्ड नं. १७-मध्ये जैन मंदिराजवळील सदनिकेचा शोषखड्डा तुंबून शेजारील जैन मंदीराच्या रस्त्यावर दुर्गंधीयुक्त घाण पाणी पसरत असल्याने भाविकांच्या उपासनेत अडथळे येत आहेत. तरी ड्रेनेज व्यवस्था करावी व दर पंधरा दिवसांनी शोष खड्डा सफाई करणेचे आदेश द्यावेत.
- वार्ड नं. ८- पार्श्वनाथनगर, शारदा हौसिंग सोसायटी, गंगानगर, अष्टविनायक नगर विद्यानगर, वारणाली, जलसंपदा कार्यालय पूर्व भाग येथे भुयार गटर योजना खोदाई मुळे रस्ते खराब झाले आहेत. तातडीने रस्ते दुरुस्ती व ड्रेनेज काम पूर्ण करावे.
- महापालिका हद्दीत नियमित डास प्रतिबंधक औषध फवारणी व गटर सफाई काम युध्द पातळीवर पूर्ण करावेत.
यावेळी अजय देशमुख, प्रशांत देशमुख, अनिल बिरनाळे, सुनील मोहिते, आनंदा लिगाडे, रविंद्र वळवडे, प्रा. एन.डी.बिरनाळे, समाधान कांबळे, दिनेश थोरात, रोहन अवडणकर, सौरभ चव्हाण, योगेश आपटे, अक्षय जाधव, शुभम मांडवकर, हुसेन इनामदार, प्रकाश गावडे, अनिता अवडणकर व वनिता पटेल उपस्थित होते.