Sangli Samachar

The Janshakti News

तुफान सेनेच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी सौ. पद्मा चव्हाण यांची निवड !



सांगली समाचार वृत्त |
सातारा - दि. २८ जून २०२४
सातारा जिल्हातील मर्ढे येथील सौ.पदमा चव्हाण यांची तुफान सेनेच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी निवड करण्यात आली. ही निवड तुफान सेनेचे संस्थापक अध्यक्ष समाजरत्न नितीनभाऊ बडेकर यांच्या आदेशाने करण्यात आली. या निवडीसाठी अनुमोदन तुफान सेनेच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा सौ. सीमा यादव यांनी दिले. या प्रसंगी महाराष्ट्र राज्य अध्यक्ष गोमटेश कोळके यांनी या निवडीचे स्वागत केले आहे. 


या प्रसंगी तुफान सेनेच्या पच्छिम महाराष्ट्र अध्यक्षा सौ. पद्मा चव्हाण म्हणाल्या, पश्चिम महाराष्ट्रात तुफान सेनेचे काम झपाट्याने वाढवून, पश्चिम महाराष्ट्रात नवी क्रांती करणार आहे, सावित्री जिजाऊच्या लेकींना एकत्र करुन तुफान सेनेचे काम जोरदार करुन समाजाला न्याय देणार आहे. तुफान सेनेचे संस्थापक अध्यक्ष आमचे नेते समाजरत्न नितीनभाऊ बडेकर यांनी मला ही संधी दिली याचे सोने करुन समाजात एक वेगळा आदर्श निर्माण करेन, 

यावेळी तुफान सेनेचे संस्थापक अध्यक्ष समाजरत्न नितीनभाऊ बडेकर म्हणाले तुफान सेनेच्या नुतन पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षा सौ. पद्मा चव्हाण एक आदर्श व्यक्तीमत्व आहे, त्यांना समाजिक कार्याची जाणीव आहे, त्यांचे संघटन कौशल्य मोठे असून त्या खात्रीपुर्वक समाजाला न्याय देतील, त्यांच्या पुढील वाटचालीच्या तुफान सेनेच्या सर्व पदाधिकार्‍यांच्या वतीने त्यांना हार्दिक शुभेच्छा.