yuva MAharashtra महाराष्ट्र भाजप मीडिया प्रभारी कडून ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांना अब्रू नुकसानीची नोटीस !

महाराष्ट्र भाजप मीडिया प्रभारी कडून ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांना अब्रू नुकसानीची नोटीस !


सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. २४ जून २०२४
महाराष्ट्रातील ज्येष्ठ पत्रकार भाजपा मीडिया प्रभारी कडून अब्रू नुकसानीचा दावा बाबत नोटीस पाठवण्यात आल्याने सर्वत्र एकच खळबळ माजली आहे. महाराष्ट्र मीडिया भाजप प्रभारी अध्यक्षा श्वेता शालिनी यांनी ही नोटीस तोरसेकर यांना पाठवले आहे. मध्यंतरी तोरसेकर यांनी भाजपच्या परावाचित कारणे सांगणारा व्हिडिओ केला होता. या व्हिडिओमुळे भाजप बाबत जनतेत संभ्रम निर्माण करण्यात आल्याचा आरोप शालिनी यांनी केला आहे.

आता भाऊ तोरसेकर याबाबत काय निर्णय घेतात, ते या नोटिशीला काय उत्तर देतात ? याकडे साऱ्या महाराष्ट्रातील मीडिया क्षेत्राचे लक्ष लागून राहिले आहे.