yuva MAharashtra प्रलंबित गुन्हे तातडीने मार्गी लावण्याचे पोलीस अधीक्षकांचे आदेश !

प्रलंबित गुन्हे तातडीने मार्गी लावण्याचे पोलीस अधीक्षकांचे आदेश !


सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २६ जून २०२४
लोकसभा निवडणूकीसह सण, उत्सवांमुळे अनेक गुन्हे प्रलंबित राहिले आहेत. सर्व प्रलंबित गुन्हे तातडीने मार्गी लागले पाहिजेत, असे सक्त आदेश पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी मंगळवारी दिले. जिल्ह्यातील सर्व अधिकाऱ्यांची मासिक आढावा बैठक झाली. यावेळी अधीक्षक घुगे यांनी अधिकाऱ्यांना आदेश दिले. तसेच नव्या कायद्यांची उजळणीही यावेळी घेण्यात आली. दिवसभर चाललेल्या बैठकीत जिल्ह्यातीस सर्व अधिकारी उपस्थित होते.

अधीक्षकांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. अण्णासाहेब जाधव, मंगेश चव्हाण, सचिन चोरबोले, विपुल पाटील, सुनील साळुंखे, निरीक्षक संजय मोरे, मुकुंद कुलकर्णी, सतीश शिंदे, ईश्वर ओमासे, बायाजीराव कुरळे यांच्यासह जिल्ह्यातील अधिकारी उपस्थित होते.


जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांचा आढावा तसेच चोरी, घरफोडीच्या गुन्ह्यांचा विशेष आढावा घेण्यात आला. हे गुन्हे रोखण्यासाठी बिट मार्शलसह गस्त सक्षम करण्याच्या सूचना करण्यात आल्या. तसेच लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर प्रतिबंधात्मक कारवाई अधिक झाल्याने खुनाच्या घटना घटल्याचे यंदा दिसून आले. तसेच प्रामुख्याने दुचाकी चो-या रोखण्यासाठी विशेष खबरदारीच्या सूचना करण्यात आल्या. दरम्यान, नव्या कायद्याविषयी पोलिस अधिकारी आणि कर्मचान्यांना अधीक्षकांनी घेतला. यावेळी प्रामुख्याने प्रत्येक पोलिस ठाण्याच्या प्रलंबित गुन्ह्यांची माहिती घेण्यात आली. त्यावेळी गुन्हे तातडीने मार्गी लावले पाहिजे, अशा सचूना घुगे यांनी दिल्या.

आढावा बैठकीनंतर पोलिस मुख्यालयाच्या परिसरात अधीक्षक घुगे आणि अधिका-यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी बोलतांना पोलिस अधीक्षक घुगे म्हणाले, "पर्यावरण संवर्धनासाठी पोलिस दलाकडून पुढाकार घेण्यात आला आहे. यंदा जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांच्या हद्दीत सुमारे पाच हजार झाडांचे वृक्षारोपण करण्यात येणार आहे. या मोहिमेत सर्व अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला.