Sangli Samachar

The Janshakti News

अखेर 'त्या' वडाच्या झाडाने घेतला मोकळा श्वास !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २१ जून २०२४
एसएफसी मॉल जवळचे - वडाच्या झाडाचा कठडा फोडून बसवलेले मॉडर्न चिकन ६५ चे खोके ड. स्वाती शिंदे, मनपा उपायुक्त वैभव साबळे व दिलीप घोरपडे यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन खोकेधारकाकडून सदरचे खोके त्या ठिकाणाहून बाजूला हटवले. खणभाग भागातील व नळभागातील हिंदू महिला अनेक वर्ष वटपौर्णिमेच्या दिवशी या वडाच्या झाडाची पूजा करत होत्या. त्या वडाच्या झाडाचा कट्टा फोडून महापालिकेची परवानगी न घेता बेकायदा मॉडर्न चिकन ६५ चे खोके बसविल्यामुळे यंदाच्या वर्षी महिलांना त्या वडाच्या झाडाची पूजा करून महिलांना फेऱ्या मारणे अशक्य होते.

परंतु आता वडाच्या झाडाला लागून अतिक्रमण केलेले खोके हटविल्यामुळे आता हिंदू महिलांना आजच्या वटपौर्णिमे दिवशी पूजा करता येणार आहे. उद्या सकाळी ठीक अकरा वाजता ॲड. स्वाती शिंदे खणभाग, नळभागातील हिंदू माता-भगिनींना घेऊन त्या वडाच्या झाडाची विधिवत पूजा करून वटपौर्णिमा साजरी करणार आहेत. 


विठ्ठल खणभाग, नागरिकांनी मंदिर ट्रस्टींनी, नळभागातील तसेच त्या परिसरातील व्यापाऱ्यांनी हिंदू एकता आंदोलनाकडे हे खोके हटविण्याची मागणी केली होती व त्यासाठी हिंदू एकता आंदोलनाने या अनधिकृत खोक्या विरोधात मोठा लढा उभा केला होता. हे खोके हटवण्यासाठी हिंदू एकता आंदोलनाने मनपा आयुक्तांना निवेदन दिले होते. तसेच त्या जागेवर जोरदार घोषणाबाजी करून निदर्शने केली होती. अखेर वडाच्या झाडाला मोकळा श्वास घेतल्यानंतर त्या परिसरातील नागरिकांनी व्यापाऱ्यांनी व विठ्ठल मंदिर ट्रस्टींनी माजी आमदार नितीन शिंदे, ॲड. स्वाती शिंदे तसेच हिंदू एकता आंदोलनाचे आभार मानले.

यावेळी हे अतिक्रमण काढत असताना शहर जिल्हाध्यक्ष संजय जाधव, राजू जाधव, अरुण वाघमोडे, अनिरुद्ध कुंभार, प्रदीप निकम, अवधूत जाधव, प्रकाश निकम, भूषण गुरव, आशिष साळुंखे, शुभम खोत, श्रीधर मेस्त्री, पंकज कुबडे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.