सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २६ जून २०२४
कृष्णामाईच्या तीरावर असलेले श्री गणपती पंचायतन संस्थानचे गणपती मंदिर, समस्त सांगलीकरांचे व आजूबाजूच्या गावातील, परिसरातील व पंचक्रोशीतील सर्व भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या गणपती मंदिरात आज अंगारक संकष्टी चतुर्थीचा योग असल्यामुळे मंदिरात सकाळपासून दर्शनासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली होती. रस्त्याच्या दुतर्फा छोटे-छोटे व्यवसाय करणारे लोकही आपला व्यवसाय करीत असून त्यासाठी मंदिराचा आजूबाजूचा परिसर हा आनंदाने भरुन गेलेला होता. मंदिरास सुंदर असे लायटींग केलेले असून गाभाऱ्यात मोगऱ्यांच्या फुलांचा सुवासिक असा सुगंध पसरलेला होता. गणपती व रिद्धी-सिद्धी यांचे तेजही आज वेगळे दिसत होते.
अशा या मंगलप्रसंगी 'आम्ही चालवू हा पुढे वारसा' या उक्तीप्रमाणे राजघराण्याचे पुढील युवराज आदित्यराजे विजयसिंह पटवर्धन यांच्या हस्ते श्रीची आरती संपन्न झाली. याप्रसंगी श्री गणपती पंचायतन संस्थानचे मॅनेजर श्री जयदिप अभ्यंकर हे उपस्थित होते.