| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ३ जून २०२४
सांगली:- देहदान व अवयव दान संकल्प हे जगातील सर्वश्रेष्ठ, मौल्यवान धाडसी संकल्प असून! याकरिता जाणीव जागृती काळाची गरज आहे. असे मनोगत प.कै.व.पा. शासकीय रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम यांनी व्यक्त केले.
शल्य चिकित्सक यांच्या दालनात आयोजित देहदान व अवयव दान संकल्प केलेल्या निवृत्त सरकारी कर्मचारी अधिकारी सन्मान व सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. कदम होते. यावेळी संकल्प केलेले श्रीरंग पाटील, पी.एन. काळे, प्रभाकर दिवाण, चंद्रकांत आपटे, तानाजी शिंगटे यांचा जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या हस्ते सन्मान व सत्कार करण्यात आला. यावेळी देहदान व अवयव दानाचा संकल्प केलेल्या निवृत्त अधिकाऱ्यांनी भावपूर्ण हृदयस्पर्शी मनोगत व्यक्त केले. यावेळी डॉ.विभीषण सारंगकर, आर. एम. ओ. श्रीमती डॉ. पाटील उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व संयोजन डॉ. अविनाश शिंदे यांनी केले. आभार डॉ. माणिकराव सूर्यवंशी यांनी मानले.