| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १२ जून २०२४
संतोष कदम खून प्रकरणी संशयित सिद्धार्थ चिपरीकर व शाहरुख शेख हे दोघेही सांगलीवाडीचे राहणारे असल्याने व ते मिळून येत नसल्याने त्यांना पकडण्यासाठी कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी एक महिन्यापूर्वी सांगली पोलिसांची मदत घेण्याचे आदेश दिले होते. संशयित सिद्धार्थ चित्रीकर हा कर्नाटकात लपून बसल्याचे सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागास कळाले होते. तशी माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांचे पथक त्याच्या मागावर होते.
आज सकाळी सिद्धार्थ कागल येथे येत असल्याची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सतीश शिंदे व त्यांच्या पथकाने त्यास सापळा रचून अटक केली. कोल्हापूर परिच्छेत्राचे पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी या संतोष कदम खुनाच्या तापसाची सातत्याने माहिती घेतली.
सांगली येथील माहिती अधिकार कार्यकर्ता संतोष कदम यांचे काही महिन्यापूर्वी कुरुंदवाड येथे निर्घृण खून करण्यात आला होता. या प्रकरणात काही राजकीय तरुण नेत्याचा हात असल्याचाही गवगवा झाला होता. त्यामुळे या प्रकरणाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले होते. परिणामी पोलिसांच्यावर या प्रकरणात तणाव होता. हे प्रकरण राजकीय हस्तक्षेपामुळे दाबले जाते की काय ? अशीही शंका व्यक्त होत होती. परंतु कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता पोलिसांनी आरोपीचा छडा लावून त्याच्या मुस्क्या आवळलेल्या आहेत. याबद्दल पोलिसांचे सर्वच क्षेत्रातून कौतुक होत आहे