Sangli Samachar

The Janshakti News

आयुष्मान कार्डवर मोफत उपचार देण्यास नकार दिल्यास, हा नंबर करा डायल !



| सांगली समाचार वृत्त |
नवी दिल्ली - दि. १७ जून २०२४
केंद्र सरकार देशातील गरीब जनतेसाठी वेगवेगळ्या योजना राबवत आहेत. ज्यामुळे त्यांना अनेक सोयी सुविधा देखील मिळत आहे. अशातच आता सरकारने गोरगरीब जनतेच्या आरोग्याची काळजी घेऊन त्यांना रुग्णालयात मोफत उपचार देण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. 

सरकार आयुष्मान भारत योजना या योजनेअंतर्गत देशातील नागरिकांना रुग्णालयात मोफत उपचार देत आहे. यासाठी त्यांनी या योजनेत समाविष्ट असलेल्या लोकांसाठी एक कार्ड बनवलेले आहे. या कार्डला आयुष्यमान कार्ड असे म्हणतात. या कार्डच्या मदतीने तुम्ही सरकारी त्याचप्रमाणे खाजगी रुग्णालयात उपचार घेऊ शकता. या योजनेअंतर्गत अनेक हॉस्पिटल नोंदणीकृत झालेली आहे. त्यामुळे आता या योजनेच्या पॅनलमध्ये समाविष्ट झालेले नागरिक कोणत्याही रुग्णालयात उपचार घेऊन शकतात.

अनेकवेळा आयुष्मान योजनेच्या पॅनलमध्ये समाविष्ट झालेले रुग्णालय आयुष्मान कार्डधारक असलेल्या व्यक्तीला उपचार देण्यास नकार देतात. त्यामुळे त्या व्यक्तीला स्वतःच्या खिशातून पैसे द्यावे लागतात. परंतु आता या पॅनलमध्ये समाविष्ट असलेल्या रुग्णालय या योजनेत समाविष्ट असलेल्या आजारांवर या कार्डद्वारे उच्चार देण्यास नकार करू शकत नाही. लोकांमध्ये माहितीच्या अभावामुळे काही रुग्णालय उपचार देण्यास नकार देतात. परंतु याबाबत पूर्ण माहीत नसल्यामुळे लोकही याबाबत तक्रार देत नाहीत.


आयुष्मान योजनेच्या पॅनेलमध्ये समाविष्ट असलेल्या रुग्णालयांमध्ये 5 लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार केले जाऊ शकतात. रुग्णालयाने मोफत उपचार देण्यास नकार दिल्यास निष्क्रिय बसू नका. तुम्ही टोल फ्री नंबर आणि पोर्टलवर तुमची तक्रार नोंदवू शकता. 14555 हा आयुष्मान भारत योजनेचा राष्ट्रीय स्तरावरील टोल फ्री क्रमांक आहे. देशातील कोणत्याही राज्यात राहणारा नागरिक यावर तक्रार करू शकतो. हिंदी आणि इंग्रजीशिवाय देशातील इतर भाषांमध्येही तक्रारी दाखल केल्या जातात.

वेगवेगळ्या राज्यांसाठी टोल फ्री क्रमांकही जारी करण्यात आले आहेत. उत्तर प्रदेशात राहणारे लोक 180018004444 या क्रमांकावर तक्रार नोंदवू शकतात. मध्य प्रदेशातील रहिवाशांसाठी टोल फ्री क्रमांक १८००२३३२०८५ आहे. त्याचप्रमाणे बिहारमधील रहिवासी आयुष्मान योजनेशी संबंधित त्यांच्या तक्रारी 104 वर नोंदवू शकतात आणि उत्तराखंडचे नागरिक 155368 आणि 18001805368 वर त्यांच्या तक्रारी नोंदवू शकतात.