yuva MAharashtra राहुल गांधींची 'ही' कृतीही ठरली देशवासीयांसाठी आकर्षण !

राहुल गांधींची 'ही' कृतीही ठरली देशवासीयांसाठी आकर्षण !


सांगली समाचार वृत्त |
नवी दिल्ली - दि. २७ जून २०२४
लोकसभेतील विद्यमान विरोधी पक्षनेते काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी आणि पंतप्रधान यांचे वेळा भोपळ्याचे नाते सर्व जगाला ज्ञात आहे. दोघेही एकमेकाला शह-काटशह देण्यात प्रसिद्ध आहेत. दोघेही एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. नुकत्याच पार पडलेल्या 18 व्या लोकसभा निवडणुकीत तर नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांनी एकमेकांवर केलेले टीका माध्यमे आणि सोशल माध्यमातून चर्चेचा विषय ठरलेले होती. 

या पार्श्वभूमीवर राहुल गांधी आपल्या अनोख्या अंदाजाने देशवासीयांचे लक्ष केंद्रित करीत असतात. 'तुम्ही मला शिव्या देऊन बोलू शकता. त्याने मला फरक पडत नाही. पण माझ्या मनात तुमच्याविषयी राग-तिरस्कार नाही," असं म्हणत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पार्लमेंटमध्ये गळाभेट घेतल्याचे आपल्याला आठवत असेल. 

अशाच प्रकारे कालची राहुल गांधी यांची कृती देशभरात व सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली. 18 व्या लोकसभेचे अध्यक्ष म्हणून ओम बिर्ला (Om Birla) यांची निवड झाल्यानंतर त्यांनी मोदी आणि राहुल गांधी यांनी त्यांच्या आसनापर्यंत घेऊन गेले. ही ससंदेची परंपरा आहे. त्यापूर्वी विविध मुद्यांवरुन एकमेकांवर तुटून पडणाऱ्या मोदी-गांधी यांच्यातील 'शेक हँड'कडे सगळ्यांच्या नजरा होत्या. दोन्ही नेत्यामध्ये झालेला हा 'शेक हँड' ऐतिहासिक ठरला. ओम बिर्ला यांचे अभिनंदन करीत दोन्ही नेत्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.


सहा वर्षांपूर्वी राहुल गांधी यांनी सभागृहात मोदींची गळाभेट घेतली होती. मोदी सरकारविरोधातील अविश्वास ठरावावर चर्चा सुरु असताना राहुल गांधीनी आपल्या भाषणात अनेक मुद्द्यांचा उल्लेख करत मोदींसह भाजप सरकारवर चौफेर टीका केली होती.

"तुमच्यासाठी मी पप्पू असेन. तुम्ही मला शिव्या देऊन बोलू शकता. त्याने मला फरक पडत नाही. पण माझ्या मनात तुमच्याविषयी राग-तिरस्कार नाही," असं म्हणत राहुल गांधी आपल्या जागेवरुन उठले त्यांनी मोदींकडे जाऊन त्यांची गळाभेट घेतली.

यानंतरही मोदींनी हसत हसत राहुल यांच्यासोबत 'शेक हँड'केलं. त्यांच्या पाठीवर थाप मारली. मग आपल्या जागेवर येत, ही आहे 'हिंदू संस्कृती' असं म्हणत राहुल गांधींनी भाषण संपवलं होतं.