Sangli Samachar

The Janshakti News

२६ जुन जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमीत्त प्रबोधन व मार्गदर्शन कार्यक्रम साजरा.


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २७ जून २०२४
२६ जुन २०२४ रोजी जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनाचे औचित्य साधून जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी समिती व सांगली जिल्हा पोलीस प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने युवकांना प्रबोधन व मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन वसंतदादा पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज ॲण्ड रिसर्च, सांगली येथे करण्यात आले होते.

सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी डॉ. राजा दयानिधी, जिल्हाधिकारी, सांगली तथा अध्यक्ष, जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी समिती हे होते. तर, प्रमुख पाहुणे डॉ. प्रकाशकुमार मोरे, मनोविकार व व्यसनमुक्ती तज्ञ, निर्मल हॉस्पीटल, मिरज हे होते. प्रमुख उपस्थिती मा. संदिप घुगे, पोलीस अधीक्षक, सांगली तथा सचिव, जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी समिती, प्राचार्य, वसंतदादा पाटील इन्स्टिट्धुट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अ‍ॅण्ड रिसर्च, सांगली यांचे उपस्थितीत सदरचा कार्यक्रम पार पडला.

महाराष्ट्र गीत गायनाने या कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आण्णासाहेब जाधव, उप विभागीय पोलीस अधिकारी, शहर विभाग, सांगली यांनी केली. त्यानंतर सदर कार्यक्रमास उपस्थित असलेल्या सर्वांना डॉ. राजा दयानिधी, जिल्हाधिकारी, सांगली, श्री. संदिप घुगे, पोलीस अधीक्षक, सांगली यांनी मार्गदर्शन केले. तसेच प्रमुख पाहुणे डॉ. प्रकाशकुमार मोरे यांनी सर्वाना अंमली पदार्थाचे सेवन केल्याने होणारे दुष्परीणाम व त्यावरील उपाययोजना याबाबत प्रबोधन व मार्गदर्शन केले. यावेळी जमलेल्या सर्वांनी अंमली पदार्थांपासून अलिप्त राहणेची शपथ घेतली.


पोलीस निरीक्षक सतिश शिंदे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगली यांनी आभार व्यक्त करून राष्ट्रगीत गायनाने कार्यक्रमाची सांगता झाली. सदर कार्यक्रमास सांगली व मिरज मधील वेगवेगळ्या शाळा च कॉलेजमधील एकुण ५०० विदयार्थी, विदयार्थिनी, शिक्षक तसेच पोलीस अधिकारी, समितीचे सदस्य हजर होते.

सांगली जिल्हयातील सर्व पोलीस ठाणे हद्दीत जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमीत्त ठिकठिकाणी प्रभात फेरी तसेच शाळा व कॉलेजमध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करून विदयार्थ्यांना सर अनुशंगाने प्रबोधन व मार्गदर्शन करण्यात आले.