| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २० जून २०२४
महागाई, बेरोजगारी, नीट परीक्षा घोटाळा, शेतकऱ्यांना उध्वस्त करणारा खते - बियाण्यांचा काळाबाजार व कायदा सुव्यवस्थेचा उडालेला बोजवारा याविरुद्ध उद्या राज्यभर काँग्रेस रस्त्यावर उतरून चिखलफेक आंदोलन करणार आहे. दि.२१ जून रोजी सकाळी ११ वा. सांगली काँग्रेस भवन समोरही सांगली जिल्हा ग्रामीण व शहर काँग्रेस कमिटीतर्फे चिखलफेक आंदोलन करुन महायुती सरकारचा तीव्र निषेध करण्यात येणार असल्याचे आमदार डॉ. विक्रमसिंह सावंत व पृथ्वीराज पाटील यांनी सांगितले.
या आंदोलनात मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते सहभागी होऊन महायुती सरकारच्या जनविरोधी कारभारावर जोरदार आंदोलन करणार असल्याचेही त्यांनी सांगून जिल्ह्यातील सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांना या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे