yuva MAharashtra सावधान! व्हाटसऍपवर आलाय नवीन ग्रुप स्कॅम

सावधान! व्हाटसऍपवर आलाय नवीन ग्रुप स्कॅम



| सांगली समाचार वृत्त |
नवी दिल्ली - दि. ६ जून २०२४
वॉटसऍपवर नवी टोळी करत आहेत स्कॅम. तुमच्या नकळत तुमचे अकाउंट होईल हॅक. सावधान राहा आणि आताच वाचा यापासून सुरक्षित राहण्याचे उपाय...

मेटाचा व्हाटसऍप हा ऍप जगभरात सुप्रसिद्ध आहे. व्हॅट्सऍपवर आपण सहज कुठूनही आणि काधीही, कोणालाही आपला संदेश पोहचवू शकतो. तसेच व्हॅट्सऍपवर दिवसेंदिवस अनेक नवनवीन फीचर्स लाँच केले जात आहेत, ज्यांचा यूजर्सना बराच फायदा होत आहे. मात्र तुम्हाला तर माहीतच आहे, जिथे तंत्रज्ञान तिथे स्कॅम, फ्रॉड्स तर आलेच.


व्हाटसऍपवर आजपर्यंत लाखो ऍक्टिव्ह यूजर्स जोडले गेले आहेत. यात व्हाटसऍपशी निगडित एक महत्त्वाची गोष्ट जाणून घेणे फार गरजेचे आहे. व्हाटसऍपच्या वाढत्या लोकप्रियतेबरोबरच व्हाटसऍपवर होणारे फ्रॉड्सदेखील वेगाने वाढत आहेत. सध्या व्हाटसऍपवर एक नवीन फ्रॉड ग्रुप यूजर्सवर आपला निशाणा साधून बसले आहेत. हे बनावट ग्रुप्समध्ये सामील करण्यास तुम्हाला प्रवृत्त करतात आणि मग तुमच्या कुटुंबाचे आर्थिक नुकसान करतात. तुमच्या नकळत यातून तुमचे पैसे लुटले जातात. या फ्रॉडपासून स्वतःची सुरक्षितता कशी करायची आणि हा फ्रॉड कसे काम करतो, याबद्दलची सविस्तर माहिती आम्ही आज या लेखातून तुम्हाला सांगत आहोत.

हा फ्रॉड कसा काम करतो

फेक कॉलर
तुम्हाला एका व्यक्तीकडून फोन येईल, जो तुम्हाला तुमचा मित्र किंवा कोणी परिचवत असल्याचे भासवेल आणि तुम्हाला फसवण्याचा प्रयत्न करेल.

फेक OTP
स्कॅमर तुमच्या फोनवर एक वन टाइम पासवर्ड पाठवेल आणि काही तरी खोटे सांगून तो पासवर्ड तुमच्याकडून मागितला जाईल. असे केल्यानंतर तुमचे व्हाटसऍप अकाउंट एका दुसऱ्या डिव्हाइसवर रजिस्टर होईल आणि तुमचे खाते तुमच्या नकळत चोरले जाईल.

टू स्टेप व्हेरिफिकेशन ब्लॉक करणे
एकदा तुमचा अकाउंट त्यांच्या नियंत्रणात आला की, ते तुम्हाला लॉक करून तुमच्या अकाउंटचे टू स्टेप व्हेरिफिकेशन सक्षम करतात. यानंतर स्कॅमर तुमच्या संपर्कांना मेसेज पाठवतात आणि खोट्या बहाण्याने पैसे मागतात.

या फ्रॉडपासून सुरक्षित कसे राहायचे

सॅमसंगचा 'बिग टीव्‍ही डेज' सेल सुरु, आकर्षक ऑफर्ससह मिळेल बरंच काही…
टू स्टेप व्हेरिफिकेशन
तुमचे अकाउंट सुरक्षित करण्यासाठी व्हाटसऍप सेटिंगमध्ये जाऊन टू स्टेप व्हेरिफिकेशन चालू करा. तुमच्या अकाउंटला अधिक सुरक्षित करण्यासाठी तुम्हाला एक युनिक कोड दिला जाईल.

तुमचा पीन कधीच शेअर नका करू
लक्षात ठेवा, तुमचा सहा अंकी व्हाटसऍप कधीही कोणासोबतही शेअर करू नका. मग तो कोणी परिचित असला तरीही हा कोड फक्त तुमच्यापर्यंतच राहुद्यात.

व्हॉईस कॉलद्वारे पुष्टी करा
तुम्हाला कोणता संशयास्पद संदेश आला मग तो अगदी तुमच्या ओळखीच्या व्यक्तीकडून जरी असला तरी, त्यांना कॉल करा किंवा त्यांच्या ओळखीची पुष्टी करण्यासाठी व्हॉइस मेसेजची विनंती करा.