Sangli Samachar

The Janshakti News

दक्षिण भारत सहलीस गेल्यानंतर 'हे' मंदिर पाहण्यास चुकू नका नका !


सांगली समाचार वृत्त |
बेंगलुर - दि. २४ जून २०२४
'भारत हा मंदिरांचा देश' असल्याचे बोलले जाते. अगदी शेकडो वर्षांपूर्वीची मंदिरे आपल्या भारतात सुस्थितीत आहेत. येथील स्थापत्यशास्त्र पाहिले की आपल्या पूर्वजांची बुद्धिमत्ता किती अचाट होते याचा साक्षात्कार होतो. आपला ऊर अभिमानाने भरून येतो. संपूर्ण भारतात अशी अनेक मंदिरे आहेत. विशेषतः दक्षिण भारतातील मंदिरांचे स्थापत्यशास्त्र आपली मते गुंग करणारे आहेत. असेच एक मंदिर.


कर्नाटकातील चिकमंगलूर जिल्ह्यातील विद्याशंकर मंदिर हे असेच स्थापत्यशास्त्राचे उत्तम उदाहरण आहे. हजारो वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या मंदिरात एक असे तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे जे आजच्या तंत्रज्ञानापेक्षा कितीतरी अधिक पटीने श्रेष्ठ मानावे लागेल. या मंदिरात बारा खांब आहेत. हे बारा खांब मराठी महिन्यावर आधारित आहेत. या खांबावर सकाळची सूर्यकिरणे पडतात. आश्चर्याची बाब म्हणजे, हिंदू पंचांगानुसार जो मराठी महिना असेल त्यानुसार येथील प्रत्येक खांबावर त्या त्या महिन्यात सूर्य किरणे पडतात. म्हणजे ज्या क्रमांका नुसार मराठी महिना असेल त्या क्रमांकाच्या खांबावर सूर्यकिरणे पडत असतात. आणि महिना बदलताच त्या पुढील खांबावर पुढील एक महिना सूर्यकिरणे पडतात. आपण कधी दक्षिण भारताच्या सहलीसाठी गेलात, तर हे मंदिर पाहण्यासाठी विसरू नका.