Sangli Samachar

The Janshakti News

भावजयीवर दीराचा जीव जडला, जलसमाधीने प्रेमाचा शेवट झाला !


| सांगली समाचार वृत्त |
लखनऊ - दि. २२ जून २०२४
हिर-रांजा, रोमिओ ज्युलियट यांची प्रेम कहाणी अजरामर झाली. याच प्रेमवीरांना साक्षी ठेवून पुढील कित्येक पिढ्यांनी प्रेमाच्या रंग खेळले. यात काही यशस्वी झाले तर काही अयशस्वी. यशस्वी झालेल्या प्रेम वीरांपैकी काही प्रसिद्ध पावले तर काही काळाच्या ओघात विसरून गेले. पण काही प्रेमात अपयशी ठरलेल्या जोडप्यांनी आपले जीवन संपवले. अशा प्रेमवीरांना समाज नंतर विसरूनही गेला. पण काही जोडपी आजही लोकांच्या स्मरणात आहेत.

अशाच एका प्रेमवीर जोडप्याने आपले आयुष्य जलसमाधीत बंदिस्त केले. ही घटना मध्य प्रदेश मधील मुरैना येथील. एका तरुणाचा आपल्या भावजयीवर जीव जडला. तिनेही त्याच्या प्रेमाला साथ दिली, आणि दोघांची प्रेमकहाणी रंगली. परंतु आपल्या नात्याला समाज मान्यता देणार नाही असे लक्षात आल्याने, दोघांनीही जीवन संपवण्याचा निर्णय घेतला. घरच्या कारसह या प्रेमवीरांनी गावाजवळच्या कुआरी नदीत जलसमाधी घेतली.

हा प्रकार तेव्हा उघडकीस आला, जेव्हा गावकऱ्यांना नदीत एक कार आढळून आली. पोलिसांना कळविण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जेसीबी आणि रेस्क्यू टीमच्या सहाय्याने शिकार बाहेर काढली. तेव्हा उपस्थितांना धक्का बसला. कारण कार मध्ये दोन सांगाडे दिसून आले. कारच्या नंबर प्लेटवरून तपास घेता, ही कार छत्ते के पुरा येथील असल्याचे निष्पन्न झाले. अधिक तपास करता गावातील निरज सखवार व तिचा दीर मिथिलेश यांचे प्रेम प्रकरण होते. चार महिन्यापूर्वी हे दोघे गावातून गायब झाले होते. कुटुंबीयांनी दोघांचा शोध घेतला परंतु दोघे आढळून आले नाहीत. पोलिसात ही तक्रार केली होती. शेवटी दोघांच्या प्रेम कहानीचा हा असा दुःखांत गावकऱ्यांना समजला तेव्हा सर्वांनी हळहळ व्यक्त केली. सिहोनिया पोलीस अधिक तपास करीत आहेत.