सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. २६ जून २०२४
सांगली जिल्हा पोलीस दलात 13 रिक्त पोलीस शिपाई चालक पदाकरिता एकूण 568 पुरुष व महिला उमेदवार शारीरिक व मैदानी चाचणी करता हजर राहिले होते. त्यापैकी 412 उमेदवाराला दि. 26/6/2024 व 27/6/2024 या कालावधीत कौशल्य चाचणी (ड्रायव्हिंग टेस्ट) बोलवण्यात आले होते या उमेदवारांपैकी ज्यांची इतर पोलीस घटकात पोलीस भरती प्रक्रियेमधील मैदानी चाचणी असल्यास सदर उमेदवारांना दि. 29/6/2019 रोजी कौशल्य चाचणी (ड्रायव्हिंग टेस्ट) देण्याकरता विश्वेश्वरय्या ट्रेनिंग कॅम्पस पाटगाव मिरज येथे बोलवण्यात आले होते.
परंतु या तारखांना घेण्यात येणारी सदर कौशल्य चाचणी (ड्रायव्हिंग टेस्ट) काही तांत्रिक कारणामुळे रद्द करण्यात आली असून संबंधित उमेदवारांना पुढील तारीख लवकरच कळवण्यात येईल याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी असे आवाहन स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे सांगली शाखा पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे. याबाबत अधिकृत माहितीसाठी संबंधित विभागाशी संपर्क साधावा, असेही आवाहन त्यांनी केले आहे.