Sangli Samachar

The Janshakti News

शक्तीपीठ महामार्ग रद्दसाठी उद्या जिल्हाधिकारी कार्यालयाला घेराव - पृथ्वीराज पाटील


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २१ जून २०२४
सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्रासदायक ठरणाऱ्या शक्तीपीठ महामार्ग आंदोलनाला काँग्रेसने पाठिंबा दर्शविला आहे. शक्तीपीठ महामार्ग शक्तीपीठ विरोधी आपला रद्दसाठी विरोधी कृती समितीसोबत काँग्रेस आंदोलनात उतरणार आहे. त्यामुळे शक्ती पीठ महामार्ग आंदोलनाची ताकद आणखी वाढणार आहे. शक्तीपीठ महामार्ग रद्दच करावा अशा मागणीसाठी उद्या शनिवारी काँग्रेसकडून नियोजन समिती सभेच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्हाधिकारी कार्यालयाला घेराव घातला जाणार आहे. तसेच सांगली जिल्ह्यातील आमदारांनी या आंदोलनाला पाठिंबा द्यावा असे आवाहन काँग्रेस नेत्यांनी केले आहे.


शक्तीपीठ महामार्गामुळे सांगली जिल्ह्यातील 1400 एकर जमीन आणि 5370 शेतकरी कुटुंबे ही बाथित होणार असल्याने या शक्तीपीठ महामार्गाला कडाडून विरोध केला जात आहे. नुकतेच कॅबिनेटमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शक्ती पीठ महामार्ग कामाला स्थगिती दिल्याचे जाहीर केले असेल तरी स्थगिती नको तर महामार्गाच रद्द करा अशी आग्रही मागणी काँग्रेस नेत्यांसह शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समितीकडून पत्रकार परिषदेत करण्यात आली आहे. या बैठकीस माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील, काँग्रेस नेते पृथ्वीराज पाटील, आमदार विक्रम सावंत, काँग्रेस नेत्या जयश्री पाटील, सतीश साखळकर, उमेश देशमुख, सिकंदर जमादार आदी उपस्थित होते .