Sangli Samachar

The Janshakti News

असंघटित क्षेत्रातील कामगारांना मिळणार पेन्शन !


| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. १८ जून २०२४
सरकार नेहमी नागरिकांसाठी वेगवेगळ्या योजना राबवत असते. नागरिकांना आर्थिकदृष्ट्या मदत करण्यासाठी अनेक योजना असतात. त्यातीलच एक योजना म्हणजे ई- श्रम कार्ड. लोकांच्या गरजा लक्षात घेऊन ई- श्रम योजना राबवली जात आहे. असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांसाठी ही योजना राबवण्यात आली आहे. या योजनेद्वारे लाखो कर्मचाऱ्यांना फायदा होत आहे. ई श्रम योजना ही असंघटित क्षेत्रातील लोकांना आर्थिक मदत मिळवून देतात.यासाठी कर्मचाऱ्यांना ई- श्रम कार्ड जारी केली जाते. या कार्डच्या माध्यमातून नागरिकांना मदत केली जाते. असंघटित क्षेत्रातील कामगार ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करु शकतात.


ई श्रम योजनेअंतर्गत कामगारांना दर महिन्याला पेन्शन मिळते. वयाच्या ६० वर्षानंतर दर महिन्याला ३ हजार रुपयांनी पेन्शदेखील त्यांना मिळणार नाही. या योजनेत जर कोणत्या व्यक्तीचा मृत्यू झाला किंवा एखादा व्यक्ती दिव्यांग असेल तर त्यांना २ लाख रुपयांचा विमा मिळणार आहे. तर अंपगत्व आल्यास १ लाख रुपयांची आर्थिक मदत मिळेल, ई श्रम कार्ड असलेल्या व्यक्तीला २ लाख रुपयांचा अपघात विमादेखील मिळणार आहे. कामगार हा असंघटीत क्षेत्रात काम करणारा असायला हवा. त्याचे वय १९-५९ वर्ष असणे गरजेचे आहे. ई-श्रम कार्ड काढण्यासाठी आधार कार्ड,आधार कार्डशी जोडलेला मोबाईल नंबर, बँक खाते असणे गरजेचे आहे. या योजनेत तुम्ही ऑनलाइन पद्धतीने अर्ज करु शकता. यासाठी तुम्हाला ई- श्रम योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करावा लागेल.