Sangli Samachar

The Janshakti News

आदम्स कंपनीविरुद्ध सांगलीत २४ जूनला महापालिकेवर मोर्चा - पै. पृथ्वीराज पवार


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २० जून २०२४
आदम्स कंपनीचा व्यवहारात अजून बदल झाला नाही. महापालिकेकडूनही अद्याप कारवाई झाली नाही, ठेकेदाराचा अन्यायी वागणुकी विरोधात येत्या सोमवार दिनांक २४-६-२०२४ रोजी सकाळी ११ वा. महापालिके समोर प्रशासनाला जागे करण्यासाठी आंदोलन करण्यात येणार आहे अशी माहिती पै. पृथ्वीराज पवार (भैय्या) यांनी दिली.

मिरज कुपवाड शहर महापालिकेस कचरा उठाव
करण्यासाठी वाहन चालक पुरवणाऱ्या आदमस इंटरप्राईजेस एंटरप्राइजेस या नावाने या कंपनीने सन २०२२ सालापासून महापालिकेस कचरा उठाव गाडीवर वाहन चालक पुरविण्याचा ठेका मिळविला. त्यांनी जवळजवळ शंभर वाहन चालक विविध विभागाकरिता पुरविले. वाहन चालक यांची नियुक्ती करताना प्रत्येक वाहन चालकाकडून ३० हजार रुपये अनामत रक्कम म्हणून भरून घेतले. शिवाय अवास्तव ५० हजार ते दीड लाख रुपये हे महापालिकेत कायमस्वरूपी नोकरी देण्याचे आश्वासन देऊन उकळळे जातात. काही वाहन चालकांनी याला भूलून सदर रक्कम भरली. कालांतराने अचानक त्यातील काही वाहन चालकांना कामावर येणेस स्थगिती देण्यात आली. त्यांनी जवळजवाळ १४ महिने काम केले होते. वाहन पुरवठा ठेकेदाराने दरमहा होणाऱ्या पगारातून प्रत्येकी ५००० रुपये द्यावेत अशी त्यांचे कडे मागणी सुरू केली. जे वाहन चालक पैसे देण्यास तयार झाले नाहीत त्यांना कामावरून कमी करण्यात आले. 


काही चालकांनी पैसे देणेस तयार झाले असता पुन्हा सांगितले जाते की, आपण दीड लाख रुपये भरल्यानंतर आपणास परत कामावर हजर करून घेतले जाईल. कामगारांच्या वर बैठबिगारीने पिळवणुक होत आहे. घंटागाडी ड्रायव्हर यांच्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध महापालिकेचे आयुक्त यांना भेटून निवेदन दिले होते