yuva MAharashtra विनोद तावडे गट महाराष्ट्रात ॲक्टीव्ह; देवेंद्र फडणवीस काय करणार ?

विनोद तावडे गट महाराष्ट्रात ॲक्टीव्ह; देवेंद्र फडणवीस काय करणार ?



| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. १४ जून २०२४
देवेंद्र फडणवीस की विनोद तावडे? महाराष्ट्र भाजपमध्ये नेमकं पॉवरफुल कोण? हा प्रश्न सर्वांना पडलाय त्याला कारण आहे पब्लिक डोमेन मध्ये चाललेल्या काही चर्चा… येणाऱ्या विधानसभेत भाजपकडून मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून विनोद तावडेंना प्रमोट केलं जाईल…फडणवीसांना दिल्लीत पाठवलं जाईल… अशा या सगळ्या चर्चांचा सेंटर पॉइंट…महाराष्ट्र भाजपमध्ये अगदी सुरुवातीपासूनच फडणवीस गट आणि तावडे गट असे दोन गट सक्रिय असल्याची चर्चा माध्यमांमध्ये असते… मात्र फडणवीसांच्या हातात सत्तेच्या चाव्या आल्यानंतर त्यांनी तावडे आणि त्यांच्या समर्थक मंडळींचा पंख छाटण्याचा कार्यक्रम सुरू केल्याचा आरोप हा नेहमीच होत असतो…मंत्रीपदावर असणाऱ्या तावडेंना 2019 च्या निवडणुकीत आमदारकीची साधी उमेदवारीही मिळाली नाही… इतकच काय तर त्यांच्या गटातल्या पंकजा मुंडे, एकनाथ खडसे यांसारख्या नेत्यांना मेनस्ट्रिम पॉलिटिक्स पासून साईडलाईनही करण्यात आलं…

मात्र कर्मा इज बॅक जसं म्हणतात तसं आता तावडे दिल्लीचा राजकारणातील बिग बॉस ठरलेत…तर फडणवीस (Devendra Fadnavis) महाराष्ट्राच्या राजकारणात पुरते अडकलेत…त्यामुळे सध्याच्या राजकारणाकडे थोडं बारकाईने पाहिलं तर महाराष्ट्र भाजपमध्ये नेमकी कुणाची हवा आहे? येत्या काळात राज्यातील भाजपची सूत्र कुणाकडे शिफ्ट होऊ शकतात? फडणवीस आणि तावडे या दोघांपैकी महाराष्ट्राचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असेल? त्याचाच हा पॉलिटिकल आढावा…फडणवीस आणि तावडे या दोघांपैकी पॉवरफुल कोण आहे? हे समजून घ्यायचं असेल तर आधी आपल्याला या दोघांचं वर्तमान राजकारण बघावं लागेल…


सध्याच्या कंडिशनला विनोद तावडे दिल्लीत चांगलेच सेट झालेत… एका मागून एक कामाचा रिझल्ट दाखवत ते भाजपच्या महामंत्री पदावर जाऊन पोहोचलेत… म्हणूनच ज्या 2019 मध्ये तावडेंना विधानसभेची उमेदवारी डावलण्यात आली होती… त्याच तावडेंनी 2024 च्या भाजपच्या लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर केली…यावरून विनोद तावडेंच्या दिल्लीतील वजनाचा आपल्याला अंदाज येऊ शकतो…हरियाणा आणि बिहार राज्यांतील निवडणुकांमध्ये प्रभारी म्हणून त्यांनी केलेल्या कामामुळे भाजप बरीच मजबूत झाली… एनडीए सरकारमध्ये किंगमेकर ठरलेले नितीश कुमार यांना युतीमध्ये घेण्यातही तावडे यांचा मोठा वाटा राहिलाय…याच सगळ्या कामांची गोळा बेरीज करता तावडेंचं नाव आता भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या शर्यतीतही सर्वात पुढे आहे..

दुसरीकडे एक टर्म मुख्यमंत्री राहिल्यावर फडणवीस यांनी आपल्या प्रतिभेचा आणि काटशहाच्या राजकारणाची महाराष्ट्राला चुणूक दाखवून दिली होती…शरद पवारांच्या तोडीस तोड नवा चेहरा महाराष्ट्राला मिळालाय, अशा शब्दात त्यांच्या कामाचा गवगवा व्हायला लागला… पण 2019 मध्ये उलटा गेम पडून जेव्हा महाविकास आघाडीची सत्ता आली तेव्हापासून फडणवीस बॅकफुटला फेकले गेले… राजकीय महत्त्वकांक्षांतून शिंदे आणि अजित दादा भाजपसोबत आले…राजकीय डावपेच टाकून फडणवीसांनी पुन्हा सत्ता खेचून आणली खरी… पण हा फोडाफोडीचा डाव महाराष्ट्राच्या काही पचनी पडला नाही…त्याचंच रिफ्लेक्शन लोकसभा निकालावर पडलं… आणि भाजपच्या जागा 23 वरून 9 वर फेकल्या गेल्या…लोकसभा लीड केल्यामुळे अर्थात या पराभवाचं खापर फडणवीसांवर फुटलं…थोडक्यात पक्षातील राजकीय पातळीवर विनोद तावडेंचा हात धरण फडणवीसांना लांब लांब पर्यंत शक्य दिसत नाहीये…

फडणवीस आणि तावडे यांच्यापैकी पावरफुल कोण हे ठरवायचं असेल तर त्याला दुसरा फिल्टर लागतो तो म्हणजे मराठा कार्ड आणि सर्वसमावेशक चेहरा

महाराष्ट्राच्या राजकारणात मराठा फॅक्टर सध्या पिकला आहे.. याचा ट्रेलर मराठा समाजाने लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या निमित्ताने दाखवून दिलाय…फडणवीसांना मराठ्यांना आरक्षण द्यायचं नाहीये, असं नरेशन या सगळ्यात बिल्डअप झालं… त्याचाच फटका म्हणजे भाजपाला मराठवाड्यात एकही जागा जिंकता आली नाही… ज्या भाजपाला ओबीसींचा पक्ष म्हणून ओळखलं जातं त्याच भाजपच्या पंकजा मुंडे यांसारख्या प्रस्थापित चेहऱ्याला ओबीसींचा प्रभाव असणाऱ्या बीडमधून मानहानीकारक पराभव स्वीकारावा लागला…अर्थात या सगळ्याला कारणीभूत कोण ठरलं असेल तर ते देवेंद्र फडणवीस…खरंतर फडणवीस सत्तेत असताना मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन त्यांनी शांतपणे हाताळायला हवं होतं… निवडणुकीच्या आधीच समाजाचा राग कसा शांत करता येईल, याचा प्रयत्न करायला हवा होता…पण असं काहीही न करता त्यांनी उलट जरांगे पाटलांवर आरोप करायला सुरुवात केली…याचा बूमरँग असा झाला? फडणवीस मराठा आणि मराठा आरक्षण विरोधी आहेत असा पर्स्पेक्टिव्ह विरोधकांनी सेट केला, ज्याचा भाजपला निवडणुकीत मोठा तोटा झाला…त्यात फोडाफोडीच्या राजकारणामुळे फडणविसांच्या बिघडलेल्या संबंधांबद्दल न बोललेलं बरं…

दुसरीकडे विनोद तावडे हे शांत, संयमी आणि अगदी पक्षाला अपेक्षित असं निर्भिड व्यक्तिमत्व आहे.. त्यात मराठा समाजातून येत असल्याने हा एक प्लस पॉईंट त्यांच्याकडे नेहमीच राहिलेला आहे…महामंत्री पदावर असले तरी त्यांचे सर्वपक्षीय नेत्यांशी असणारे संबंध हे आपल्या सर्वांनाच ठाऊक आहेत… त्यामुळे सध्याच्या घडीला फडणवीसांच्या नेतृत्वाला महाराष्ट्रातून होत असणारा विरोध आणि नेतृत्वासाठी असणारी पोकळी पाहता विनोद तावडे यांचं विमान महाराष्ट्रात लॅंड करुन त्यांचा चेहरा मुख्यमंत्रीपदासाठी प्रोमोट केला जाण्याची शक्यता अधिक आहे…थोडक्यात तावडे यांच्याकडे एकाचवेळेस मुख्यमंत्रीपद तर त्याच वेळेस राष्ट्रीय अध्यक्षपद अशी डबल धमाका ऑफर त्यांच्याकडे आहे तर दुसरीकडे मात्र मुख्यमंत्रीपदावर राहिलेल्या फडणवीसांना राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी धडपड करण्याची सध्या वेळ आलीय…

फडणवीस आणि तावडे यांच्यापैकी पावरफुल कोण हे ठरवायचं असेल तर यातल्या शेवटच्या मुद्द्याचा विचार करायला लागतो तो म्हणजे संघांचा आणि दिल्लेश्वरांचा पाठींबा…. होय. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं आणि दिल्ली हायकमांडचं पारडं या दोघांपैकी कुणाच्या बाजूने झुकतंय, यावरही बरीच समिकरण अवलंबून आहेत… सांगायचं झालं तर अमित शहा आणि फडणवीस यांच्यात सुप्त संघर्ष असल्याच्या बातम्या आपल्या अनेकदा कानावर पडल्या असतील. त्यात संघालाही शांतपणे कसलाही आरडोओरडा न करता निमुटपणे काम करणारी माणसं सत्तेच्या केंद्रस्थानी असलेली आवडतात… थोडक्यात काय तर या दोन राजकारण्यांचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा भाजप हायकमांड आणि संघाचंही तावडेंच्या बाजूने पारडं जड दिसतं…

फडणवीस आणि तावडे यांच्यापैकी पावरफुल कोण? या प्रश्नाच्या निष्कर्षापर्यंत पोहचायचं असेल तर कोणत्याही अँगलने पाहायचं झालं तर तावडे फडणवीसांपेक्षा कित्येक पटींनी यात वरचढ ठरलेले दिसतात… त्यामुळे येत्या काळात महाराष्ट्र भाजपमध्ये मोठी उलथापालथ झालीच तर तावडे यांचं नाव मोठ्या पोजिशनला आपल्याला दिसेल एवढं मात्र नक्की…