yuva MAharashtra शिफ्ट संपली, टाटा, बाय-बाय! ड्युटी संपताच अख्खी मालगाडी रुळावर सोडून निघाले मोटरमन अन् गार्ड...

शिफ्ट संपली, टाटा, बाय-बाय! ड्युटी संपताच अख्खी मालगाडी रुळावर सोडून निघाले मोटरमन अन् गार्ड...


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १५ जून २०२४
भारतीय रेल्वेमध्ये नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना नोकरीसाठी मिळणाऱ्या वेतनाव्यतिरिक्तही इतरही अनेक सुविधा मिळतात. असं असतानाची रेल्वे विभागातील दोन कर्मचाऱ्यांनी नुकतंच असं काही केलं, की देशभरात त्यांच्याच नावाची चर्चा सुरु आहे. कारण, शिप्ट संपल्यानंतर अर्थात कामाचे तास संपल्यानंतर मोटरमन आणि गार्डनं त्यांची जबाबदारी असणाऱ्या मालगाडीला रुळावरच सोडलं आणि ही मंडळी निघून गेली.... 

खतम, टाटा, बायबाय ! 

हे असं काही म्हटलं की, काही Memes डोळ्यासमोर येतात. पण, इथं हेच शब्द अचूकपणे लागू होत आहेत. उत्तर प्रदेशातील उन्नाव येथून एक विचित्र बातमी समोर आली आहे. जिथं कामाचे तास पूर्ण झाल्यामुळं रेल्वेचा मोटरमन मालगाडी रुळावरच सोडून निघून गेला. फक्त मोटरमनच नव्हे, तर त्याच्यासमवेत गार्डही निघून गेला आणि यामुळं बुधवारी सकाळी 7 वाजल्यापासून दुपारी साधारण दीड वाजेपर्यंत डाऊन मेन लाईन मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. 


रेल्वेचे मोटरमन आणि गार्ड मालगाडी सोडून गेलेले असताना त्यानंतर त्याच कामासाठी नियुक्त असणारे दुसरे मोटरमन आणि गार्ड येऊन क्यांनी ही मालगाडी रायबरेलीच्या दिशेनं पुढे नेली. शिफ्ट संपल्यामुळं अचानक काम सोडून गेलेल्या या दोन्ही महाशयांमुळं जवळपास सात तासांसाठी मालगाडी एकाच ठिकाणी उभी राहिली आणि त्यामउळं कानपूरहून लखनऊला जाणारी शताब्दी एक्स्प्रेस, झांसी इंटरसिटी यासह जवळपास 15 ट्रेनचं वेळापत्रक कोलमडलं. 

असं कोण करतं... 

कानपूरहून रायबरेलीच्या दिशेनं निघालेली ही मालगाडी ज्यावेळी गंगाघाट स्थानकात पोहोचली तेव्हा सिग्नल न मिळाल्यामुळं ही मालगाडी मुख्य रुळावरच थांबवण्यात आली. काही वेळानंतर या रेल्वेचे मोटरमन आणि गार्ड स्टेशन मास्तरांकडे पोहोचले आणि त्यांनी आपल्या कामाचे तास संपल्याचं सांगितलं. त्यांनी मेमो देऊन मालगाडी रुळांवरच उभी ठेवून त्या दिवसाचं काम थांबवलं आणि ते निघून गेले. यानंतर मात्र अनेकांचीच तारांबळ उडाली. तिथं या मालगाडीची चाकं साखळदंडांनी बांधून त्यावर लाकडाचे ओंडके बांधण्याच आले, जेणेकरून ही मालगाडी रुळांवरून घसरणार नाही. कामाचे तास संपले म्हणून थेट काम आहे तिथं आहे तसं सोडून निघून गेलेल्या या रेल्वे कर्मचाऱ्यांना पाहून आता नेटकरी म्हणून लागले आहेत, 'क्या ही कमाल किए है...!